छत्रपती विद्यालय सितेपार येथे क्रिडामहोत्सवाला प्रारंभ

0
11

आमगाव,दि.25ः तालुक्यातील छ्त्रपती विद्यालय सितेपार येथे दोन दिवसीय क्रिडामहोत्सव कार्यक्रमाचे उद्दघाटन करण्यात आले.सदर कार्यक़म अध्यक्षस्थान श्री संत गाडगे महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष श्रीमती एम.व्ही.चौधरी यांनी भुषविले. तर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिगंबर बिसेन यांनी कार्य्रक़माचे उद्दघाटन केले. कार्यक्रमाला पालक शिक्षक संघाचे सहसचिव लिखीराम हरिणखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
शाळेचे मुख्याध्यापक एम.एस.पटले यांनी प्रास्ताविक केले.संचालन स.शि.ओम.एम.बोपचे यांनी तर आभार कु.मेश्राम मैडम यांनी मानले. आर.एस.जैतवार,श्री कटरे,श्री नागपुरे,सुर्यवंसी यांनी पंचाचे काम पाहीले.शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने विविध क्रिडा स्पर्धेत सहभागी झाले.