गोरेगाव,दि.25ः- आदीलोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बोळुंदा येथे चार दिवसीय स्नेहसंमेलनानिमित्त माता-पालक व महिला मेळावा वहळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या हळदीकुंकू व महिला मेळाव्याचे अध्यक्ष विजू वैद्य हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच धुरपता कटरे आसलपाणी यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख वक्ता/ मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ता प्रा.डाॅ.सविता बेदरकर,तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाथोडे /शिंदे,दिव्या भगत उपस्थित होते.कार्यक्रमाचे दीपप्रज्वलक म्हणून श्री गुरुदेव आदिवासी शिक्षण मंडळ गोविंदपूरच्या उपाध्यक्ष रंजना चाकाटे,आशा बिसेन उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य के.एस.वैद्य यांनी केले. सविता बेदरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत महिला एकत्रित आल्याने विचाराची देवाण-घेवाण होते असे सांगितले.कार्यक्रमात आलेल्या महिलांनी उखाणे सांगून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी शाळेतील सहाय्यक शिक्षक के. बी. बघेले, सहाय्यक शिक्षिका कुमारी पी. सी. चुलपार, सहाय्यक शिक्षिका कुमारी एन. पी. पटले, सहाय्यक शिक्षिका कुमारी एस. एन. बोपचे, प्राध्यापक आर. व्हि. राऊत, प्राध्यापक डी. आर. राहांगडाले तसेच लिपिक एम. बी. राऊत तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी व परिसरातील असंख्य महिला वर्ग उपस्थित होते.