औरंगाबादच्या प्रणव कोरडेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी घोडदौड

0
20

दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने मारली संसनाटी धडक

औरंगाबाद–नेपाळ टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित *इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन वर्ल्ड टेनिस टूर नेपाळची राजधानी काठमांडू* येथे ज्युनियर J 60 ची टूर्नामेंट आयोजित केली गेली आहे सदर टूर्नामेंट मध्ये इंदुरान्स मराठवाडा टेनिस सेंटरचा औरंगाबादचा खेळाडू *प्रणव कोरडे (महाराष्ट्र) आणि *स्मित पटेल* (गुजरातचा) खेळाडू या *भारतीय जोडीने* टेनिस च्यादुहेरीच्या मॅचेस मध्ये (व्हिएतनाम चा) नागो लाम काओ आणि कय इन यांग ( चायनीज ताईपी) या *अवलमानांकित तिसरी सीड असलेल्या खेळाडू यांच्यावर ७-६(३-७),३-६,१०-३ असा सणसणाटी विजय संपादन करून टूर्नामेंट मध्ये मोठी झेप मारली आहे कॉटर फायनल मध्ये प्रवेश केला आहे अशाप्रकारे विजयाची घोडदौड चालू केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही भारतीय जोडी खेळाडूंना रँकिंग आहे. *प्रणव कोरडे* यास इंडोरन्स मराठवाडा एम एस एल टी ए सेंटरने स्वागत केले असून हा त्या सेंटर चा खेळाडू असून त्याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले सर व प्रवीण प्रसाद यांचे मार्गदर्शन लाभले आहे हा औरंगाबादचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे तसेच सेंटर प्रमुख आणि इंदुरान्स कंपनीने च्या सर्वेसर्वा जैन मॅडम यांनी प्रणव चे कौतुक केले आहे तसेच पुढील मॅचेस साठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहे.