गोरेगावात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन जिल्हाभरातून 76 प्रतिकृती सादर

0
27

गोरेगाव,दि.०७::, . स्थानिक शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे मंगळवार, 7 फेब्रुवारी रोजी 21 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील होते, उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून जिप उपाध्यक्ष व शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती इंजि. यशवंत गणवीर, महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, समाज कल्याण सभापती पूजा सेठ, गोरेगाव पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, डॉ. लक्ष्मण भगत, प्रिती कतलाम, विमल कटरे, जिल्हा परिषद सदस्य शैलेंद्र नंदेश्वर, पंचायत समिती सदस्या नलिनी सोनवारे, रामेश्वर महारवाडे, डायटचे प्राचार्य राजेश रूद्रकार, खंडविकास अधिकारी अजितसिंह पवार, शिक्षणाधिकारी माध्य. कादर शेख, शिक्षणाधिकारी प्राथ. डॉ. महेंद्र गजभिये, उपशिक्षणाधिकारी प्राथ. अनिल चव्हाण, उपशिक्षणाधिकारी प्राथ. दिघोरे, सहायक गटविकास अधिकारी गौतम, विस्तार अधिकारी पंचायत बोरकर, गटशिक्षणाधिकारी निलकंठ सिरसाटे तसेच सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनीमधील विविध प्रतिकृतींचे अवलोकन करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मांडले. या दोन 21 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक गटात 24, माध्यमिक गटात 24, आदिवासी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक गटातून 8, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक गटात प्रत्येकी 8 व प्रयोग शाळा सहायक गटात 4 असे एकूण 76 प्रतिकृती विज्ञान प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विज्ञानाचे विविध पैलूविषयी मार्गदर्शन केले. संचालन व्ही.एस. चौधरी व दिनेश अंबादे यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी निलकंठ सिरसाटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. प्रभाकर लोंढे, महेन्द्र सोनेवाने, केंद्रप्रमुख बोपचे, सर्व केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील कर्मचारी, गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत येणारे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आदींनी सहकार्य केले.