14 मार्चपासून जु्न्या पेंशनकरीता गोंदिया जिल्हयातील कर्मचारी बेमुदत संपावर

0
62

गोंदिया,दि.22ः- नविन पेंशन योजना बंद करुन सर्वाना जुनीच पेंशन योजना लागु करा या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 17 लाख राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक/शिक्षकेत्तर जिल्हा परिषद कर्मचारी येत्या 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जात आहेत.या सपांत सर्व कर्मचारी बंधु भगिनीणी मोठ्या संख्येत सहभावी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी महासंंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे यांनी केले आहे. 14 मार्च 2023 च्या संपाबाबत राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक –शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक लिलाधर पाथोडे यांनी एम.सी.चुऱ्हे अध्यक्ष मध्यवर्ती संघटना गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ कार्यालयात सभा घेत माहिती दिली.
कर्मचाऱ्यांना म्हातारपणाचा एकमेव आसरा त्यांची पेंशन ही कायदेशिररित्या सट्टा बाजारात लावण्याकरीता देण्यात आली आहे. पेंशन देण्याकरीता शासनाने आपले अंग काढले आहे. प्रत्येक क्षेत्राात काम करणारे कर्मचारी दिनांक 01.11.2005 च्या नंतर नोकरीला लागले असतील या सर्वांना सरकारच्या तिजोरीतुन पेंशन देण्यात येत नाही.त्यांना पेंशन पाहिजे असल्यास सरकारणे नियोजित केलेल्या कंपान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. राज्य शासनाच्या अशा या दुटप्पी धारणामुळे, व राज्य शासनाचे उदाशिन धोरन पाहून कर्मचारी वर्गात तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे राज्यातील 17 लाख कर्मचारी दिनांक 14.03.2023 पासुन बेमुदत संपावर जात आहे. यात गोंदिया जिल्हयातील राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असे 30 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
समन्वय समितीचे सभेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. सभेमध्ये समन्वय समितीचे निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे,सरचिटनिस शैलेस बैस, उपाध्यक्ष कमलेश बिसेन,लिपीक संघटनेचे अध्यक्ष संतोष तोमर,महासंघ महिला उपाध्यक्ष कु. चित्रा ठेंगरी, महिला समिती अध्यक्ष कु. तेजस्विनी चेटुले, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगीरथ नेवारे, श्रीमती अनिता नैकाने, पाटबंधारे संघटनेचे चंद्रशेखर वैद्य, ज्योतीक ढाले, शिक्षक भारतीचे प्रकाश ब्राम्हणकर, आरोग्य संघटनेचे किशोर भालेराव, प्राथमिक शिक्षक समितीचे किशोर डोंगरवार, पुरोगामी संघटनेचे हिरामन येरणे,स.प्र.अ./क.प्र.अ. संघटनेच्या सरिता वंजारी, वनविभाग संघटनेच्या वैशाली पाटील, दिव्यांग संघटनेचे ओ.जी.बिसेन यांनी मार्गदर्शन केले. सभेमध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विठ्ठल भरने, रमेश नामपल्लीवार, लिलाधर तिबुळे, राजानंद वैद्य, कुलदिप कापगते, रामा जमईवार, प्राजक्ता रनदिवे, जयश्री सिरसाटे, संदिप तिडके, अभिजीत बोपचे, प्रमोद काळे, ए.एच.टेंभुरकर, आदी उपस्थित होते. सभेचे संचालन पी.जी.शहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन लिलाधर तिबुळे यांनी केले.