IPL 2023: आजपासून रंगणार IPLचा रणसंग्राम! गोंदियातील बुक्की होणार व्यस्त

0
16

गोंदिया(खेमेंद्र कटरे)-.आजपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.क्रिकेटचे सामने सुरु झाले की सट्टाव्यवसायीक असलेल्या बुकींचा व्यवसाय जोमात फळाला येतो.या व्यवसायात कोट्यावधीची उलाढाल होत असून गोंदिया शहरात लहान मोठे 25 च्या जवळपास क्रिकेटवर सट्टा चालवणारे बुकी असून 10-15 हे मोठे बुकी आहेत तर त्यांच्या हाताखाली लहान बुकी शहरातील अनेक कानाकोपर्यात विखुरलेले आहेत.

गोंदिया शहरातील काही बुकी तर हे गोंदिया मुख्य भाजीफळविक्री बाजारात फळभाज्यांची दुकाने लावून बसले असून आमचा या व्यवसायाशी काहीही संबध नाही असे आवर्जून सांगतात.हेच बुकी मात्र सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांना आपल्या अवैध कमाईची रक्कम पोचवून पोलिसांपासून व इतरांना सरंक्षण मिळवून घेत असल्याचेही चित्र गोंदिया शहरात आहे.विशेष म्हणजे या सामन्यादरम्यान पोलीस विभाग व बुकीमध्ये मोठ्याप्रमाणात फिक्सींगची चर्चा राहत असून नाममात्र कारवाई करतोय हे दाखवण्यासाठी पोलिसांची एक चमू कारवाई करीत असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे.विशेष पोलीस विभागातील काही जुने कर्मचारी हे वर्षानुवर्ष गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यातच कार्यरत राहिले त्यांपैकी काहींचे या बुकींशी घनिष्ठ संबध असल्याची चर्चा आहे.

आयपीएलच्या मागील हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सच्या संघाला 14 सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकता आले होते तर, 10 सामन्यांमध्ये त्यांच्या पराभव झाला होता. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमेरॉन ग्रीन मुंबईसाठी आक्रमक सुरुवात करतील, तर ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची अपेक्षा आहे आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर असेल. तर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गोलंदाजीची जबाबदारी इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर असेल. मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असेल जाणून घ्या.

Mumbai Indians Playing 11 : मुंबई इंडियन्स प्लेईंग 11 

रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, शम्स मुलानी/अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला/कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

Mumbai Indians Team : मुंबई इंडियन्स संघ 

रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, ऱ्हाय रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंह, शम्स मुलानी, नेहल कुमार वधेरा, हृतिक शोकीन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, डुआन जॅनसेन, ट्रिस्टन स्टब्स, आणि विष्णू विनोद

MI साठी IPL 2023 वेळापत्रक

2 एप्रिल 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, बेंगळुरू
8 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
11 एप्रिल 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
16 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई
18 एप्रिल 2023 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद
22 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, मुंबई
25 एप्रिल 2023 : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद
30 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई
3 मे 2023 : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मोहाली
6 मे 2023 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई
9 मे 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
12 मे 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई
16 मे 2023 : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, लखनौ
21 मे 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई