राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया १२ जून रोजी

0
16

गोंदिया : अखिल महाराष्ट्र ग्रामीण लेदर क्रिकेट असोसिएशन व गोंदिया जिल्हा ग्रामीण लेदर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ जूनपर्यंत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठी आहे.या स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया १२ जून रोजी सर्कस मैदानात ठेवण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी दोन पासपोर्ट फोटो, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड सोबत घेवून सकाळी ८ वाजता सर्कस मैदानात उपस्थित रहावे, असे आवाहन सचिव अनिल शहारे, बंशीधर शहारे, बाळा ठाकरे, अमन चौरसिया, कफील अहमद, मनिष माथरे, अश्‍विन शहारे यांनी केले आहे.