चिचटोला अँलोपॅथिक आँग्ल दवाखान्याचे लोकार्पण

0
8

गोंदिया : आरोग्य विभाग जि.प. गोंदियामार्फत चिचटोला येथे अँलोपॅथिक आँग्ल दवाखाना जि.प.अध्यक्ष उषा मेंढे या सन २00४ ला महिला व बाल कल्याण समिती सभापती असताना अथक प्रयत्नाने मंज़ूर केलेला होता. दवाखाना सुरू झाल्यानंतर निरंतर सुरू होता. परंतु सदर दवाखान्याची इमारत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत होते. दवाखान्याची इमारत बांधकामाकरिता जागेची उपलब्धता करुन ४ डिसेंबर २0१५ रोजी भूमिपूजन करण्यात आले. ४ जून रोजी दवाखान्याची इमारत पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळा करण्यात आला. या वेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, सभापती आरोग्य व शिक्षण समिती पी.जी. कटरे, सभापती समाजकल्याण समिती वडगाये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वंजारी, सभापती पं.स., जि.प. सदस्य विजय टेकाम, उप विभागीय अभियंता वाघाये, पं.स. सदस्य लोकेश अग्रवाल, ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच उपस्थित होते