महिला हॉकीची कर्णधार तिकीट कलेक्टर

0
34

वृत्तसंस्था
राजनांदगाव,दि.13- रिओ ऑलिंपिकसाठी मंगळवारी महिला आणि पुरुष संघाची घोषणा करण्यात आली. हॉकी इंडियाने सरदार सिंहच्या जागेवर लंडन ऑलिंपिकमध्ये राखीव खेळाडू राहिलेल्या पीआर श्रीजेशला पुरुष संघाचे कर्णधारपद दिले. तर, सुशीला चानूला महिला संघाचे कर्णधारपद दिले गेले. सुशीला मुंबईत तिकीट कलेक्टर आहे. दुसरीकडे, मिडफिल्डर रेणुका यादवची कहाणी एकदमच वेगळी आहे. ती घरोघरी जाऊन दूध विकायची. ब्राझीलमध्ये रिओ डी जेनेरोत येत्या 5 ऑगस्टपासून ऑलिंपिक सुरु होत आहे.

कहाणी रेणुकाची…
छत्तीसगडमधील राजनांदगावाची रहिवासी 22 वर्षीय रेणुकाने वरिष्ठ संघात फेब्रुवारी 2015 मध्ये स्थान पटकावले.17 महिन्याच्या अथक मेहनतीनंतर तिला ऑलिंपिक टीममध्ये स्थान मिळाले.ती खूपच संघर्ष करून इथंपर्यंत पोहचली आहे.रेणुकाचे कुटुंब दूध विकून उदरनिर्वाह करते. यात रेणुकाही हातभार लावायची. रोज सायंकाळी ती घरोघरी दूध वाटायची.तासनतास उभे राहून दुस-यांचा खेळ पाहायची रेणुका.जेव्हा दूध पोहचवायला जायची तेव्हा रस्त्यावरून जाताना पालिकेचे एका शाळेचे मैदान लागायचे.तेथे मुले हॉकी खेळायची. त्यांना पाहून ती थोडी थांबायची व दूधाचा किडली सायकलला अडकवून हॉकी पाहत बसायची.एक दिवस तिने हॉकीची स्टिक पकडली आणि खेळायला सुरुवात केली.ती खूपच गरीब परिवारातील आहे. माध्यशिक शिक्षण तिचे महाराणी लक्ष्मीबाई शाळेमध्ये झाले.येथूनच तिने स्टेट आणि नॅशनल टूर्नामेंट खेळली. यानंतर 2009 मध्ये साई ग्वालियरने रेणुकाचा खेळ पाहून तिला अकादमीमध्ये बोलावले.2009 मध्ये चांगली कामगिरी केल्याने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई), ग्वालियर येथे गेली.येथूनच ज्युनिअर महिला हॉकी टीममध्ये सहभागी. स्कॉटलॅंडमध्ये संघाला विजयी केले.जुलै 2013 मध्ये तिचे वरिष्ठ संघात निवड झाली.

कोण आहे कर्णधार सुशीला चानू
36 वर्षानंतर क्वालिफाय झालेल्या संघाची कर्णधार सुशीला मणिपुरची आहे.8 वर्षापासून मुंबईत ज्युनिअर तिकीट कलेक्टर म्हणून काम करत आहे.साईच्या ग्वालियर अकादमीत ट्रेनिंग घेत आहे.