विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणारा महोत्सव म्हणजे अटल क्रीडा महोत्सव:-इंजि यशवंत गणविर

0
19

अर्जुनी मोर.-तालुक्यातील गोठणगाव केंद्र स्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद सदस्य श्रिकांत घाटबांधे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गणवीर म्हणाले की, शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया च्या मागील वर्षापासून अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात केली.विद्यार्थ्यांना निव्वळ अभ्यासक्रम शिकवला जात होता परंतु त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना प्रदर्शित करण्याची संधी त्यांना मिळत नव्हती.बौद्धिक विकासासोबत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना एक मंच मिळावा त्यांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळावी म्हणून या अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याला कशाची तरी आवड असते, कुणाला खेळात तर कुणाला सांस्कृतिक कार्यक्रमात,शिक्षकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळवुन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे जेणेकरून उद्या त्याच्या अंगी असलेली कला नावारूपास येईल.उदाहरण द्यायचे झाल्यास भारत देशाचे माजी राष्ट्रपती आदरणीय डॉ अब्दुल कलाम साहेब अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून जागतिक किर्ती निर्माण केली त्यांचे वडील चेन्नई च्या समुद्र किनारा मासेमारी करायचे आणि कलाम साहेब स्वतः वर्तमान पत्र वाटुन शाळेत जायचे परंतु त्यांच्या मनात असलेल्या जिद्द आणि चिकाटीने देशाचे नावलौकिक केली अशीच उर्जा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करावी व पालकांनी सुद्धा आपला पाल्य काय करु शकतो त्याला कशात रुची निर्माण झाली आहे याकडे लक्ष द्यावे व आपल्या पाल्यांला प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने पंचायत समिती सदस्य आम्रपाली डोंगरवार, सरपंच पुष्पाताई डोंगरवार, शाळा समिती अध्यक्ष श्रिकांत हटवार, पोलिस उपनिरीक्षक संदिप भोसले,बिट अंमलदार प्रेमदास होळी, सत्यवान शहारे विषयतज्ञ गटसाधन केंद्र, पोलिस पाटील मनोज मेश्राम, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष गोवर्धन राऊत, माजी पंचायत समिती सदस्य दिनदयाल डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य नरेश बोरकर,आरती कोडापे, माधुरी कोडवते,सत्यशिला मडावी,किरण मानकर, माजी पंचायत समिती सदस्य सुशिलाताई हलमारे, योगराज हलमारे,एस.के.राउत, मोरेश्वर मानकर, धनपाल चोरवाडे,वातु कोरेटी, डॉ पी.के.चोरवाडे, अर्जुन मानकर,बकाराम कोडापे,बकाराम डोंगरवार, बाबुराव शहारे, रामेश्वर हटवार, मुख्याध्यापक शेंडे,केंद्रातील सर्व शिक्षक तथा विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत पार पडला.