- 24 डिसेंबरपर्यंत आक्षेप/हरकती सादर करावे
गोंदिया, दि.12 : सामान्य प्रशासन विभागाच्या 21 सप्टेंबर 2017 चे शासन निर्णयानुसार दिलेल्या निर्देशानुसार शासकीय सेवेत असतांना मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याकरीता जिल्हा परिषद गोंदिया यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची सन 2024 या वर्षापर्यंतची तात्पुरती प्रतिक्षा यादी (प्रकरणांची स्थिती 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत) जिल्हा परिषद गोंदियाचे अधिकृत संकेतस्थळ www.zpgondia.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीवर काही आक्षेप/हरकती असल्यास 24 डिसेंबर 2024 पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया येथे लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह सादर करता येतील. असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) फरेंद्र कुतिरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.