तिरोडा,दि.१५ः- पंचायत समिती अंतर्गत केंद्र चिखलीचे अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन गराडा येथे दि.११ ते १३ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 13 शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
या स्पर्धेत सर्वात जास्त बक्षिसे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंदीपुर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्याने शाळेला क्रीडाप्रविण्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.मेंदीपुर शाळेला खालील खेळांमध्ये यश प्राप्त झाले.क्रीडाप्रविण्य -प्रथम,माध्य. मुले खोखो – द्वितीय,माध्य. मुले कबड्डी- द्वितीय,माध्य. मुली खो खो- द्वितीय,प्राथ. मुली खो खो- प्रथम,प्राथ. मुले कबड्डी -द्वितीय,१०० मी धावणे – प्रथम माध्य. मुली, मीनाक्षी टेंभरे,लांब उडी – द्वितीय, प्राथ. मुली, प्रियांशी बारसागडे लांब उडी – द्वितीय, माध्य. मुली – मीनाक्षी टेंभरे या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक जे.एम.डहाटे व शिक्षक अरुण भगत, आनंद भगत, महेंद्र रहांगडाले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच मेंदीपुर चे संरपच धर्मदास चौधरी, यंशवत सुर्यवंशी शा.व्य.सदस्य,माजी शा.व्य अध्यक्ष निलकंठ टेंभरे, अनिरुध्द चौधरी, किरण सुर्यवंशी, अहिंसक सुर्यवंशी, कृष्णकुमार बारसागडे,गुड्डु पटले व पालकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे शाळेच्या यशाबद्दल अभिनंदन केले.