गोंदिया, दि.28 : जिल्ह्यातील नगरपालिका कार्यक्षेत्रात कुष्ठरोग बाबत समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत शहरी भागात 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृध्दींगत करु. त्याबाबतचा गैरसमज दूर करु व कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती मागे राहणार नाही याची दक्षता घेऊया असा संकल्प करु. सदर मॅरेथॉनची सुरुवात जयस्तंभ चौक-फुलचूर नाका-सारस चौक परत सारस चौक-फुलचूर नाका-जयस्तंभ चौक असे मार्गक्रमण होणार आहे. तरी सदर मॅरेथॉन उपक्रमात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय, गोंदिया यांनी केले आहे.