भाजपा जिल्हा किसान आघाडीचे आयोजन
* वरिष्ठ नागरिकांचा सत्कार
गोंदिया,दि.२९ : शेतकरी बांधवांचा आवडीचा खेळ म्हणून शंकरपट हे लोकप्रिय आहे. लोप पावत असलेले आपले गावठी खेळ आता परत सगळीकडे खेळले जात आहेत. कबड्डी, खो-खो हे तर खास चर्चेत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. बैलगाड्यांची शर्यत बघण्यासाठी व भाग घेण्यासाठी आपल्या परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. या खेळांना फक्त मनोरंजनापुरते न बघता आपल्या सामाजिक जिवनात एकोपा, प्रेम टिकून रहावा व तो वाढावा यासाठी उपयोगात आणावा, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आ. हेमंत पटले यांनी केले.
ते मौजा कारंजा येथे सोमवार, २७ जानेवारी रोजी सिध्दान्त बाबा पटांगणात आयोजित शंकरपटाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.येशुलाल उपराडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात प्रामुख्याने जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आ. खोमेश रहांगडाले, जि.प.सभापती व किसान आघाडी जिल्हाध्यक्ष योपेंद्रसिंह (संजय) टेंभरे, प.स.सदस्य अजाबराव रिनाईत, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे, अशोक हरिणखेडे, देवचंद नागपूरे, धनवताबाई उपराडे, स्नेहाताई गौतम, सरपंच नोकचंद कापसे, विठ्ठल हरडे, दिनेश रहमतकर, देवेंद्र नागपूरे, भाविकाताई रंगारी, शिवलाल ढेकवार, कारूभाऊ रहमतकर, मिताराम हरडे, लोकेश उपराडे, देवलाल पटले, नरेश चौधरी, सुनिल गराकाटे, मारोती भिमटे, टेकचंद बलभद्रे, कपुरचंद रंगारी, अरुण राऊत, अरविंद हरडे, मधू शहारे, शंकर बारेवार, दिनेश तिडके, मिलन रामटेककर, सुभाष मडावी, संतोष राहंगडाले, डॉ. मुन्ना तुरकर, हिरालाल टेंभरे, दिनेश रहमतकर, राजू उईके, मनोहर बघेले, सरिताबाई शहारे, केतन उंदीरवाडे, मंगलसिंह मसे, मधु शहारे, राजकुमार बिसने, अशोक नागपुरे, गजानन नागपुरे, टाईमलाल तराम, महेंद्र मदारकर, जनार्दन रंगारी, बाबा बिसेन आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मैदानात देव पुजनाने करण्यात आली. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून बैल जोडीची पुजा करण्यात आली. प्रास्ताविक करतांना संजय टेंभरे म्हणाले की, आमची ही परंपरा अखंडीतपणे सुरू आहे. गावकरी व परिसरातील शेतकरी बांधवांचे प्रेम व सहकार्यामुळे हे सर्व शक्य आहे. या शंकरपटामुळे आता गावात पुन्हा बैलजोडी, बैलबंडी दिसू लागल्या आहेत, सेंद्रिय शेतीत वाढ होत चालली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांना पुढे नेण्याचे स्वप्न साकार होत असल्याचे ही ते म्हणाले. दरम्यान कार्यक्रमानिमित्त गावातील वरिष्ठ नागरिकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाला खोमेश रहांगडाले, लायकराम भेंडारकर, भाजपा जिल्हाध्यक्ष उपराडे, सरपंच आदि मान्यवरांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र शहारे यांनी केले.