26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home क्रीडा भारताची मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी

भारताची मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी

0
20

मुंबई, दि. १२ – चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची 6 बाद 182 अशी अवस्था करुन विजय सुनिश्चित करणा-या भारतीय संघाने आज उरलेली विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताने इंग्लंडचा 1 डाव 36 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडचे उर्वरित चार फलंदाज अवघ्या 13 धावात तंबुत परतले आणि इंग्लंडचा डाव 195 धावांवर संपुष्टात आला. चौथ्या कसोटीत एकूण मिळून 12 बळी घेणा-या रविचंद्रन अश्विनने पाचव्या दिवशी इंग्लंडचे शेपूट वळवळून दिले नाही. बेअरस्टो, वोक्स, राशिद, अँडरसन या इंग्लंडच्या शेवटच्या चारही फलंदाजांना अश्विनने माघारी धाडले.