22.7 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home क्रीडा सूर्याटोला, मौदा कबड्डी संघाने मारली बाजी

सूर्याटोला, मौदा कबड्डी संघाने मारली बाजी

0
23

भजेपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन
सालेकसा,दि.05 : येथील नवयुवक कबड्डी क्लब आणि संवेदना बहुउद्देशिय संस्था भजेपारच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर तीन दिवसीय भव्य प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात पुरूष गटातून सूर्याटोला संघ तर महिला गटातून भंडारा जिल्ह्यातील मौदा संघाने अव्वल बाजी मारली.
तीन दिवसीय महिला आणि पुरूष कबड्डी स्पर्धेत एकूण ४० संघ सहभागी झाले होते. यात गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आणि नागपूर, भंडारा जिल्ह्यातील संघाचा समावेश होता. पुरूष गटातून चुटीया संघाने दुसरे स्थान तर बनगाव स्ांघाने तृतीय स्थान पटकावला. महिला गटातून वायएमसी कबड्डी क्लब गोंदियाने दुसरे स्थान पटकावले तर आई जिजाऊ कबड्डी क्लब भजेपार संघाने तीसरे स्थान पटकावले. विजेत्या संघांना प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार आणि तृतीय ४ हजार असे रोख आणि स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. बक्षीस वितरणाला जि.प.सदस्या लता दोनोडे, राजु डोंगरे, प्रभारी सरपंच तुकाराम फुंडे, पृथ्वीराज शिवणकर, अरूण चुटे, खुशाल शिवणकर, चंद्रकुमार बहेकार, दिलीप पाथोडे, राजाराम चुटे, बालकृष्ण हेमणे, लोकेश चुटे, विवेक बहेकार, सावलराव बहेकार, रामकलाबाई शिवणकर, प्रमिला बहेकार, निर्मलाबाई कठाणे यांची उपस्थिती होती. यशस्वी आयोजनासाठी मंडळ अध्यक्ष चंद्रकुमार पाथोडे, हेमंत बहेकार, विजय बहेकार, हेमंत चुटे, तुलशी ब्राम्हणकर, विनोद ब्राम्हणकर, अविनाश बहेकार, ज्योती चुटे, कल्पना बहेकार, वत्सला शिवणकर, कृष्णाबाई बहेकार, सुनंदा राऊत, योगीता राणे यांसह नवयुवक कबड्डी क्लब, संवेदना बहुउद्देशिय संस्था आणि भजेपार ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

blank