33.2 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home क्रीडा अंजोरा येथे प्रौढ महिला, पुरुष कबड्डी स्पर्धा

अंजोरा येथे प्रौढ महिला, पुरुष कबड्डी स्पर्धा

0
27

भजेपार : जवळच्या अंजोरा येथील अंजोरा प्रौढ कबड्डी क्लबच्या वतीने स्थानिक पाणी टाकी क्रीडांगणावर ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय प्रौढ महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष गटाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ११ हजार १११, ७ हजार ७७७ आणि ५ हजार ५५५ रुपयांच्या पुरस्कारासह प्रोत्साहनपर अनेक पुरस्कार देण्यात येणार आहेत. आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांच्या हस्ते कबड्डी स्पधेर्चे उद््घाटन ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होईल.
यावेळी सहउद््घाटक रमेश बहेकार, उपाध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील महिला आणि पुरुष खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.