विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज १० फेब्रुवारी पर्यंत सादर करावे

0
9

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज आधारकार्ड बँकेशी सलग्न आवश्यक

गोंदिया,दि.२ : शैक्षणिक सत्र २०१६-१७ जिल्ह्यात एकूण २६३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आर्ज भरले आहे. जिल्ह्यातील २६३ महाविद्यालयापैकी १८० महाविद्यालयाने फी स्ट्रक्चर मंजुरीकरीता नस्ती सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर केल्या आहे. आर्थिक वर्ष संपण्याकरीता केवळ दोन महिने शिल्लक असतांना ८२ महाविद्यालयाने अजुनपर्यंत फी स्ट्रक्चर फाईल या कार्यालयाला सादर केल्या नाही त्यामुळे या महाविद्यालयाची फी मंजूर करता आलेली नाही.
जिल्ह्यात याच वर्षात एकूण ३३११७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले असून १०९५६ विद्यार्थ्यांची हार्ड कॉपी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाला प्राप्त झाली असून त्यांना मंजूरी देण्यात आली आहे. आजही २२१६१ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत आहे व २२१६१ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाने हार्ड कॉपीसह सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया या कार्यालयात १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज सादर करावे. अर्ज सादर करतांना विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँकेशी सलग्न केले किंवा नाही याची खात्री करुनच १० फेब्रुवारी २०१७ च्या आत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाला सादर करावीत. १० फेब्रुवारी २०१७ नंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. फी स्ट्रक्चर मंजूरीमुळे किंवा हार्ड कॉपी सादर न केल्यामुळे एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास समाज कल्याण कार्यालय जबाबदार राहणार नाही.
तरी जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्याचे शिष्यवृत्ती अर्ज भरले किंवा नाही, त्याला आवश्यक असणारे कागदपत्रे महाविद्यालयाला सादर केली किंवा नाही व महाविद्यालयाने सदरची कागदपत्रे सहायक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयाला सादर केली किंवा नाही याची शहानिशा विद्यार्थी व पालकांनी करावी. जेणेकरुन सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल व कोणीही शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. सहायक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयाला प्राप्त झालेले अर्ज तपासण्याकरीता वेळ लागत असल्यामुळे १० फेब्रुवारी २०१७ नंतर अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. शैक्षणिक सत्र २०१५-१६ मधील १८०२ अर्ज महाविद्यालय स्तरावर असून त्यांनी अर्जूनपर्यंत हार्ड कॉपीसह अर्ज सहायक आयुक्त कार्यालयाला सादर केले नाही व जिल्हास्तरावर ११४७ अर्ज हार्ड कॉपी सादर न केल्यामुळे सदरचे अर्ज निकाली काढता आले नाही. तरी हार्ड कॉपी सादर केली किंवा नाही याची शहानिशा सहायक आयुक्त कार्यालयामध्ये जावून करावी. सत्र २०१५-१६ ची शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभागाने मंजूर केली असून ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली किंवा नाही याची शहानिशा पालकांनी करावी. शिष्यवृत्ती प्राप्त न झाल्यास काही समस्या असल्यास महाविद्यालयातील प्राचार्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले आहे.