वर्ल्डकपचे आजपासून धुमशान, दोन उद्घाटन सोहळे

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मेलबर्न/ख्राइस्टचर्च – क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाचा रणसंग्राम अवघ्या दोनच दिवसांवर आला आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपची पहिली लढत शनिवारी असली तरी स्पर्धेचे उद‌्घाटन गुरुवारी होणार आहे. यंदा दोन देश संयुक्तरीत्या वर्ल्डकपचे यजमान असल्यामुळे उद‌्घाटन सोहळेही दोन ठिकाणी होत आहेत. भारतीय वेळेनुसार पहिला सोहळा न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. त्याच्या तीन तासांनंतर ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये दुसरा सोहळा पार पडेल.

आयसीसीनुसार, या सोहळ्यांची सर्व तिकिटे विकली आहेत. सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रम, शानदार आतषबाजी व आजवर न ऐकलेला एक “विशेष क्षण’ त्याचे वैशिष्ट्य असेल. सोहळ्यात १४ देशांच्या विविधतेचे सादरीकरण होईल. दोन्ही सोहळ्यांचे जगभरात टीव्हीवर थेट प्रसारण केले जाणार आहे.१५ तारखेला भारत v/s पाक
शनिवारपासून विश्वचषकातील लढती रंगतील. ख्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड व श्रीलंकेत पहिला सामना होईल. दुसरी लढत मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड यांच्यात होईल. रविवारी सकाळी ९ वाजेपासून भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. त्याची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. भारताने विश्वचषकात आजवर पाकिस्तानविरुद्ध एकदाही पराभव पत्कारलेला नाही.