अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीस मोदी अनुपस्थित राहणार

0
5

नवी दिल्ली- दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवारी) ‘चाय पे’ चर्चा झाली. पंतप्रधानांचे निवासस्थान 7, रेसकोर्स रोडवर सकाळी साडे दहा वाजता केजरीवाल यांनी मोदींची पहिली औपचारिक भेट घेतली. सुरुवातीला हात जोडून नंतर हस्तांदोलन करून मोदींनी केजरीवाल यांचे स्वागत केले. यावेळी ‘आप’ मनीष सिसोदिया उपस्थित होते. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदींकडे केली.
दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौ-यावर असल्याने शपथविधी सोहळ्यास येता येणार नाही असे नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवाल यांना सांगितले आहे. मात्र दिल्लीच्या विकासासाठी केंद्राकडून सहकार्य मिळेल तसेच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार करु असे आश्वासन मोदींनी केजरीवाल यांना दिले आहे.

केजरीवाल आणि नरेंद्र मोदींमध्ये 14 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी हसत-हसत चर्चा केली. हस्तांदोलन करून नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांचे स्वागत केले. परंतु, गळाभेट घेतली नाही. दरम्यान, केजरीवालांनी बुधवारी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी केजरीवालांची गळाभेट घेतली होती.
तसेच केजरीवाल यांनी मोदींना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले. मोदींनी ते निमत्रंण स्विकारले. मात्र, मोदी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान मोदी 14 फेब्रुवारीला महाराष्‍ट्रातील बारामतीचा दौरा करणार आहे. मोदींचा हा दौरा पूर्वनियोजित आहे.या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मोदी एकाच मंचावर ‘साथ-साथ’ दिसणार आहे.

केजरीवाल यांनी ‘कलंकित पैसा’ स्वीकारला – शांती भूषण
भेटीमध्ये पंतप्रधानांकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. याआधी केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.