25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home क्रीडा मॉडेल कान्व्हेंटचे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

मॉडेल कान्व्हेंटचे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

0
30

गोरेगाव,दि.२०-येथील श्री तुलसी शिक्षण संस्था गोरेगावद्वारे संचालित मॉडेल कॉन्वेंट गोरेगावच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन १९ मार्चला गुरुकृपा लॉन येथे उत्साहात पार पडले.या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आर.डी.कटरे होते.क्रीडा महोत्वाच्या आयोजनाबद्दल बोलतांना संस्थाध्यक्ष कटरे म्हणाले की,विद्याथ्र्यांच्या सुप्तगुणामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यामाध्यमातून विविध खेळामध्ये चांगले खेळाडू निर्माण करण्याचा उद्देश असतो.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून गोरेगावच्या नगराध्यक्ष सिमाताई कटरे, शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष निलेश पारधी,लोकेश बारसागडे,मुख्याध्यापिका छाया पी.मेश्राम,श्री मिटकरी,श्री बागळकर,रामभाऊ हरिणखेडे,सुधीर येडे,संतोष रहांगडाले,श्री.नागोसे,बी.आर.गौतम,नगरसेवक सुरेंद्र पटले उपस्थित होते.यावेळी बोलतांना नगराध्यक्ष सिमाताई कटरे म्हणाल्या की,विद्याथ्र्यांनी आपल्या बालवयापासूनच शिक्षणासोबतच क्रीडास्पर्धेमध्ये नैपुण्यकसे मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.यावेली निलेश पारधी व सुरेंद्र पटले यांनीही विचार व्यक्त केले.संचालन अर्पण चौधरी व धनश्री बिसेन यांनी केले तर आभार सुमित रहागंडाले व दिशा कटरे यांनी मानले.