गोंदिया पोलिसांतर्फे अहिंसा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0
15

गोंदिया,दि.२५ः-महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी पोलिस विभागाच्या वतीने अहिंसा मॅरथानचे आयोजन केले आहे. यात सहा किमी, २१ किमीची हाफ मॅराथॉन व ४२ किमीची फुल मॅराथॉनचा समावेश आहे. मॅराथॉन स्पर्धा १६ वर्षावरील महिला व पुरुषांकरिता खुली आहे. यात एकूण अडीच ते तीन लाखांपयंर्तचे पुरस्कार असून २७ सप्टेंबर नोंदणीची अंतिम तारीख आहे. जिल्ह्यातील सर्व १६ पोलिस स्टेशनमध्ये नोंदणी करता येईल. प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र व टी-शर्ट मिळणार असून विजेत्या स्पर्धकांना मुंबई येथे होणाèया मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या २ ऑक्टोबर रोजी गोंदिया धावणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी दिली.
पोलीस अधीक्षक बैजल पुढे म्हणाले की, सदर दौड पोलीस मुख्यालयातून सुरु होऊन आमगाव मार्गावरील सारस चौक, खमारी, अदासी, तांडा, दहेगाव, ठाणा, बोथली, गोरठा या मार्गावर घेण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ ते दुपारी १२ पर्यंत या रस्त्यावरील रहदारी प्रतिबंधीत करण्यात आली आहे. सदर मॅराथॉन स्पधेर्अंतर्गत ६ किमीची स्पर्धा सकाळी ८ वाजता, हाफ मॅराथॉन सकाळी ६ वाजता व फुल मॅराथॉन सकाळी ५ वाजता सुरु होणार असून पोलिस मुख्यालय कारंजा येथे संपणार आहे. हाफ व फुल मॅराथॉनसाठी जिल्ह्यातील लांब अंतरावरील स्पर्धकांसाठी १ ऑक्टोबर रोजी राहण्याची व जेवणाची व्यवस्था पोलीस विभागातर्फे करण्यात आली आहे. महिला व पुरुष गटात स्पर्धकांना प्रत्येकी दहा पुरस्कार रोख व पदक स्वरुप देण्यात येणार आहे. यात ६ किमी स्पर्धेत प्रथम पुरस्कार ५ हजार, व्दितीय ३ हजार, तृतीय २ हजार तसेच ४ ते १० क्रमांक पटकाविणाèयांना स्पर्धकांना १ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. हाफ मॅराथॉनमध्ये प्रथम १० हजार, व्दितीय ७ हजार, तृतीय ५, चतुर्थ ३, पाचवा २ हजार तसेच पुढील पाच स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये पुरस्कार आणि फुल मॅराथॉन स्पर्धेत प्रथम १५ हजार, व्दितीय १० हजार, तृतीय ७ हजार, चतुर्थ ५ हजार, पाचवा ३ हजार, सहावा २ हजार तसेच नंतरच्या चार स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. स्पर्धेत विजेत्यांची मुंबई येथे होणाèया मॅराथॉन स्पर्धेसाठी निवड केली जाणार असून जिल्हा पोलीस विभागातर्फे स्पर्धकांचा खर्च केला जाणार आहे.