युवा संकल्प विकास संस्था द्वारे भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा 25 पासून

0
12

गोंदिया,दि.२५ः~ शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी युवा संकल्प बहुउद्देशीय विकास संस्था द्वारे 25 नोव्हेंबर आज पासून भव्य रा़़़त्रकालीन क्रिकेट टूर्नामेंट चा आयोजन करण्यात आले आहे. ही क्रिकेट स्पर्धा गोंदियातील सर्कस ग्राउंड वर सायंकाळी 6 वाजता सुरूवात होणार आहे. समापन कार्यक्रम 9 डिसेंबर ला स्पर्धेच्या भव्य अंतिम फेरी सामना व पुरूस्कार वितरण कार्यक्रमाद्वारे होणार आहे.
स्पर्धेची सुरूवात आज सायंकाळी 6 वाजता गोंदिया विधानसभाचे आमदार गोपालदासजी अग्रवाल यांच्या हस्ते शहर पोलिस निरीक्षक मनोहर दाभाडे यांच्या उपस्थिीत होणार आहे. कार्यक्रमच्या यशस्वीतेकरिता माजी नगरसेवक राकेश ठाकुर यांच्या नेतृत्वात कार्यकारिणी आणि परिसरातील तरूण क्रिकेटर अध्यक्ष सचिन ठाकुर, उपाध्यक्ष मदन उपाध्याय ,सचिव बंटी ठाकुर, खंजाची मिक्की अग्रवाल आणि सदस्यगण योगी खंडेलवाल, गुरप्रितसिंग गुरूदत्ता, आकाश पुरोहित, नविन जोशी, अप्पु अग्रवाल, बाब ु गुप्ता, प्रथम माधवानी, गौरव अग्रवाल, राजा जायसवाल, बंटी सोमवंशी, रसीद सोलंकी, रोमी ठाकुर, अस्सु शर्मा,अमीत श्रीवास्तव, कालु शर्मा आणि परिसरातील तरूण मंडळी सहकार्य करणार आहे.