छोटा गोंदियातील मतदार ओळखपत्र श्रीनगरातील कचर्यात:२४ तासात अहवाल देण्याचे निर्देश

0
7

गो़दिया,दि.२४ः गोंदिया शहरात निवडणूक मतदार ओळखपत्र कचर्याच्या ढिगार्यात मिळण्याचे सत्र काही था़बंण्याचा प्रकार संपेना.गेल्या महिन्यात आमगाव तालुक्यातील मतदारओळखपत्र आढळल्यानंतर आज शनिवारला छोटा गोंदिया भागातील १४ मतदार ओळखपत्र श्रीनगर परिसरात कचरागाडीत आढळल्याची घटना उघडकूस आली.या घटनेला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान  जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना 24 तासाच्या आत सदर प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विषयाचे गांभीर्य पाहून जिहाधिकाऱ्यांनी तात्काळ एफ आई आर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

श्रीनगर परिसरातील एका कचरा गोळा करणार्या घंटागाडीचालकाला काही मतदान ओळखपत्र आढळून येताच त्यांने परिसरातील सुधाकर ढोमने या प्रतिष्ठित इसमाला देत जाळून टाका असे सांगितले.परंतु त्यांनी तसे न करता घरी आणून मुलाला दिले असता मुलगा शुभम ढोमने याने हे मतदार ओळखपत्र असल्याचे लक्षात येताच काम करीत असलेल्या कार्यालयात आणले आणि जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आणि घटनास्थळाला भेट देत तपासणीला सुरवात केली आहे.

यापुर्वीच्या प्रकरणात ३ दिवसात चौकशी करून तत्कालीन ३ कर्मचार्यावर निलबंनाची कारवाई करण्यात आली होती.