मुख्यमंत्री चषक स्पर्धेची गोंदिया विधानसभा मतदारसंघात सांगता

0
46

गोंदिया,दि.07ःः गोंदिया विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री चषक स्पर्धेचा समारोप करण्यात आला असून विजयी संघाना जिल्हास्तरावर आयोजित स्पर्धेत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेत तब्बल ८ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. गोंदिया, कामठा, काटी आणि नागरा अशा चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेमध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल, १०० मी.दौड,खो-खो,कबड्डी,मॅरेथॉन,4०० मीटर दौड,कॅरम,गायन स्पर्धा,नृत्य स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी अशा विविध १२ प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. २ डिसेंबरला या स्पर्धेंचा समारोप गोंदिया येथे पार पडला. विजेत्या संघ आता जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. विजेत्यांना २५ डिसेंबर नंतर होणाऱ्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री चषक स्पर्धेत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कबड्डी स्पर्धेत संत गाडगेबाबा क्रीडा मंडळ गोंदियाने प्रथम क्रमांक, ओम साई मंडळ मुर्री व्दितीय, संगम क्लब बिरसोला तृतीय, वीर शिवाजी क्रीडा मंडळ छिपीयाने चौथा क्रमांक पटकाविला. मुलींमध्ये यंग मल्टी पर्पज सेंटरने प्रथम, शिवाजी क्लब कासाने व्दितीय व बाल गणेश मंडळ ढाकणीने तृतीय क्रमांक पटकाविला. खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये शिवाजी क्लब कासा प्रथम, फाईव्ह स्टार क्लब चुटिया व्दितीय, जय हो क्रीडा मंडळ कामठा तृतीय व यंग मल्टीपर्पज सेंट गोंदियाने चौथा क्रमांक, मुलींमध्ये शिवाजी क्लब कासा प्रथम, बाल गणेश मंडळ ढाकणी व्दितीय व डीसीसी गोंदियाने तृतीय क्रमांक पटकाविला. व्हॉलीबॉल मुलांमध्ये यंग मल्टीपर्पज सेंटर गोंदिया प्रथम, मुलींमध्ये यंग मल्टीपर्पज सेंटर गोंदियाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

क्रिकेटमध्ये मुलांच्या गटात गोंदिया स्टार प्रथम, सिंकदर क्रिकेट क्लब कारंजा व्दितीय, किंगफिशर क्रिकेट क्लब कामठा तृतीय, स्पार्टन क्रिकेट क्लब पांढराबोडी चौथा क्रमांक, मुलींमध्ये बटरफ्लॉय क्रिकेट क्लब कामठाने प्रथम, शिवाजी क्रिकेट क्लब काटीने व्दितीय क्रमांक पटकाविला. रांगोळी स्पर्धेत रांगोळी लव्हर्स क्लब प्रथम, एमएससी ग्रृप व्दितीय, आरपीआर ग्रृप तृतीय, पीएचके गृप प्रोत्साहन पर व रांगोळी क्रिएशन ग्रृपने प्रोत्साहन पर क्रमांक प्राप्त केला. चित्रकला स्पर्धेत हरीश दादसेनाने प्रथम, पलक दादोरे व्दितीय तर वैभव मेश्राम याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. कॅरम स्पर्धेत अजय बैरागीने प्रथम, रोशन मेंढे व्दितीय, राहूल अंबादे तृतीय व विरेंद्र चव्हाण याने चतुर्थ क्रमांक पटकाविला. ४०० मी.दौड मुलांमध्ये लोकेश टेंभुर्णेकर (नागरा) ने प्रथम, संजय तुरकर (काटी) व्दितीय, अंकित उदापुरे ( गोंदिया) तृतीय व जगदिश नागेले (कामठा) याने चौथा क्रमांक, मुलींमध्ये ज्योति फुंडे (कामठा) प्रथम, संतोषी लिल्हारे (नागरा) व्दितीय, काजल नागफासे (काटी) तृतीय, माधुरी बावणकर (गोंदिया) चौथा क्रमांक, १०० मी.दौड मुलांमध्ये जागृत सेलोकर (नागरा) प्रथम, अंकित पाचे (गोंदिया) व्दितीय, रविंद्र मेश्राम (काटी) तृतीय, अमित नैकाने (कामठा) चौथा क्रमांक, मुलींमध्ये नेहा मारवाडे (गोंदिया) प्रथम, संतोषी लिल्हारे (नागरा) व्दितीय, असिका डोंगरे (कामठा) तृतीय, काजल नागफासे (काटी) हिने चौथा क्रमांक प्राप्त केला.

कुस्ती स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये ५७ किलो ओमप्रकाश बंजारे प्रथम, नुर अली सैय्यद व्दितीय, ६५ किलो गटात आशिष यादव प्रथम, संदिप रहांगडाले व्दितीय, ७४ किलो गटात राकेश बंजारे प्रथम, रोहित कनोजिया व्दितीय, ८६ किलो गटात महेंद्र कोसरे प्रथम, वरूणसिंह राठोड व्दितीय, ८६ किलो वरील गटात गुलशन यादव प्रथम, राहूल फुलमाळी व्दितीय तर मुलींमध्ये ४८ किलो गटात जिन्नत पठाण प्रथम, रविना बारेले व्दितीय, ५५ किलो गटात शुभांगी ठाबरे प्रथम, विशाखा मागोटे व्दितीय, ६४ किलो गटात अमिषा चिखलोंडे प्रथम, ७४ किलो गटात फिजा शेख प्रथम, प्रिया वजारे व्दितीय, ७५ किलोवरील गटात मैथीली झा हिने प्रथम क्रमांक पटकाविला तसेच गीतगायन स्पर्धेत प्रथम अमोल गुंडगे, द्वितीय हितेश पांडे,तृतीय गोविंद भारती यांनी पटकाविला. नृत्य स्पर्धेत प्रथम जी ९ ग्रुप, द्वितीय जय अम्बे ग्रुप,तृतीय समा ग्रुप व आधार महिला संघठन याना प्रोत्साहन पर क्रमांक पटकाविला.