मुंबई-नागपूर संघाचा विजय,गोंदिया संघाचा पराभव

0
7

गोंदिया,दि.११ः-येथील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे गोंदिया जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विदयमाने आयोजित ‘राज्य स्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेच्या दुसèया दिवसाच्या सामन्यांना पावसचा फटका बसला.रविवारच्या रात्रीला व सोमवारला सकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे मैदान ओले झाल्याने फुटबॉलचे सामने उशीरा सुरु करण्यात आले.त्यात पहिल्या दिवशी उदघाटनानंतर झालेला सामना नागपूर अकादमीने अमरावती एंजलचा पराभव करुन qजकला होता.त्यानंतर झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात नागपूर महिला संघाने गोंदिया महिला फुटबॉल संघाचा पराभव केला.तर यंग बाईज फुटबॉल क्लब औरगांबाद विरुध्द सिटी क्लब गोंदियामध्ये झालेल्या सामन्यामध्ये औरगांबाद संघाने सिटि क्लब गोंदियाचा २-० ने पराभव केला.
दुसèया दिवशी आयोजित सामन्यामध्ये इंदिरानी स्पोर्टस क्लब पुणे विरुध्द राहुल फुटबॉल क्लब नागपूर यांच्यात झालेल्या सामन्यात राहुल फुटबॉल कल्ब नागपूरने ५-४ ने सामना qजकला.सामनाच्या वेळेत एकाही संघाने गोल न केल्याने दोन्ही संघाला पेनाल्टी कार्नर मिळाले.त्यामध्ये राहुल फुटबॉल क्लबने पेनाल्टी सुटच्या माध्यमातून ५ गोल केले तर इंदिरानी स्पोर्टस क्लब पुणे ने ४ गोले केले.त्यानंतर झालेल्या दुसèया सामन्यात युनियन बँक ऑफ इडिया मुंबईने ४ गोल करीत उत्कल फुटबॉल क्लब गोंदियाचा ४-० असा पराभव केला.
पहिल्या दिवशी रात्रीला झालेल्या महिला संघांच्या प्रदर्शनीय सामन्याची सुरुवात इंडीयन मेडीकल असोसिएशन अध्यक्षा डॉ. जयपुरीया व लायन्स क्लब गोंदियाच्या अध्यक्षा सविता अग्रवाल यांचे हस्ते करण्यात आली.या सामन्यामध्ये नागपुर महिला संघाने गोंदिया महिला फुटबॉल संघाचा १-० अशा फरकाने पराभव केला.या सामन्यामध्ये नागपूर फुटबाल संघाच्या महीमाने एकमेव गोल केला.त्यानंतरच्या यंग बॉईज फुटबॉल क्लब औरंगाबाद संघाकडून वारेक अहमद व आर्यन बावेजा यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. या दोन्ही सामन्यांदरम्यान जिल्हा परिषद मुंडीपार शाळेच्या वि दयाथ्र्यांनी पारंपारीक लेझीम नृत्य सादर केले.