बनगाव पाणी पुरवठा योजनेचा पुरवठा बंद

0
5

आमगाव,दि.11ः-बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पिण्याचे शुद्ध पाणी घेणार्‍या गावांकडे ऑक्टोबर २0१८ अखेर ६१ लाख ५ हजार ३६६ रुपये इतकी पाणी पट्टीची वसुली थकित झाल्यामुळे १८ गावांचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे.
आमगांव पंचायत समितीच्या २३ आणि आमगांव नगर परिषदेच्या ६ गावा पैकी १६ गावाचा पानी पुरवठा बंद करण्यात आला आहे. या पंचायत समितीमधील चिरचादबांध या गावाकडे ४ लक्ष ५२ हजार ४२५ रुपये ही सर्वात मोठी थकबाकी आहे तर सर्वात कमी ३३ हजार ३६0 रुपये थकबाकी ठाणा या गावाची आहे.
पंचायत समिति सालेकसा अंतर्गत ४ गावाना या योजनेतून पानी पुरवठा होत आहे या पैकी सकारिटोला या गावाची पानीपट्टीची थकबाकी सर्वात जास्त ७ लक्ष २४ हजार ६२४ रूपये आहे. तर सातगावची थकबाकी १ लक्ष ७२ हजार ७६0 रूपये इतकी थकित आहे. म्हणून या दोन्ही गावाचा पानी पुरवठा बंद झाला आहे.
बनगाव प्रादेशिक पानी पुरवठा योजनेतून २00८ पासून जनतेला शुद्ध पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत आहे या योजनेतील लाभर्थिना दर माह १00 पानी पट्टीची आकारनी केलि जाते इतकी कमी पानीपट्टीची वसूली करण्याचे योग्य नियोजन प्रत्येक ग्राम पंचायत ने करने जरूरीचे आहे.
या योजनेतील गावांना पिण्याचे पाण्याची टंचाई कधीच होणार नाही अणि त्या गावात साथीचे रोग पसरणार नाही अशी जनजागृति करण्याची गरज आहे. थकबाकीदार ग्राम पंचायतने पाणी पट्टीची रक्कम तत्काळ भरावी, अशी विनंती बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कृती समितीचे संयोजक जगदीश शर्मा यांनी केली आहे.