भारताचा विजयी षटकार, झिम्बाब्वेवर 6 विकेट्स राखून विजय

0
15

ऑकलंड – टीम इंडियाने विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना जिंकत विजयी षटकार मारला आहे. टीम इंडियाने झिम्बाब्वेने दिलेले 288 धावांचे लक्ष सहा विकेटस राखून पूर्ण केले. सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमी भागीदारीने भारताने हा विजय मिळविला.

भारतीय फलंदाजी
भारताला पहिला झटका रोहित शर्माच्या (16) रुपाने बसला. पनियांगाराच्या चेंडूंवर पुलकरण्याचा नादात सिकंदर रझाने त्याचा झेल अलगद टीपला.

धवन स्वस्तात बाद
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. त्याने फक्त 4 धावा केल्या आणि तो बोल्ड झाला. पनियांगाराने त्याचा त्रिफळा उडवला. टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यात येथील ईडन पार्क मैदानावर सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 48.5 षटकात सर्वबाद 287 धावा केल्या. भारताच्या मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहित शर्माने प्रत्येकी तीन विकटे घेतल्या, तर आर. आश्विनने एक मोहरा टीपला. झिम्बाब्वेकडून कर्णधार ब्रेंडन टेलरने शानदार शतक झळकावले आणि 138 धावांची खेळी केली. त्याशिवाय सीन विल्यम्सने अर्धशतकी खेळी केली.

झिम्बाब्वेची फलंदाजी
झिम्बाब्वेला पहिला झटका मास्कदजच्या रुपाने बसला. तो फक्त 2 धावा काढून उमेश यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार धोनीकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर चिभाभा 7 धावांवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर धवनच्या हातून बाद झाला. सोलेमन मीरे 9 धावांवर मोहित शर्माच्या चेंडूंवर धोनीकडून बाद झाला. आघाडीचे तिन्ही फलंदाज दहा धावा देखील काढू शकले नाही.
तीन विकेट स्वस्तात गमावल्यानंतर मैदानात उतरलेला कर्णधार ब्रेंडन टेलर निर्धाराने खेळला. त्याला सीन विल्यम्सचने चांगली साथ दिली. विल्यम्स आणि टेलरने झिम्बाब्वेचा डाव सावरला. विल्यम्सने कर्णधार टेलरसोबत चौथ्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आश्विनने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. विल्यम्सने 57 चेंडूत तीन चौकार आणि तेवढ्याच षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्यानंतर ब्रेंडन टेलरने 138, इरविन (27), सिकंदर रजा (28), पनियांगारा (6), चकाब्वा (10) आणि चतारा (0) बाद झाले.

…यासाठी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ईडन पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आयसीसी वर्ल्डकप 2015 च्या ‘ब’ गटातील पाच साखळीचे सामने जिंकल्यानंतर धोनी ब्रिगेड विजयी षटकार मारण्याच्या इराद्याने गोलंदाजी केली. त्याआधी धोनी म्हणाला, आज आम्हाला बदल करायचा आहे, त्यासाठी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आम्ही चर्चेत आहोत त्याचे कारण आमची टीम उत्कृष्ट खेळत आहे. तर, झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रेंडन टेलर म्हणाला, ‘आजचा सामना आमच्यासाठी भावनिक आहे. आज आम्ही विश्वचषकातील शेवटचा सामना खेळत आहोत. मला आशा आहे, की आम्ही आमच्या प्रवासाचा शेवट विजयाने करु.’