29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home क्रीडा अंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत जान्हवीचे सुयश

अंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत जान्हवीचे सुयश

0
22

गोदिया,दि.29 : देहरादून येथे प्रथम आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या योग स्पर्धेत जान्हवी दिनेश फुलबांधे या विद्यार्थीनीने उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर सहावा क्रमांक पटकाविला. तिच्या यशामुळे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिच्या कामगिरीची दखल घेऊन बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने २३ जानेवारी रोजी स्थानिक रेलवे स्थानकात जान्हवीचा सत्कार करण्यात आले.
देहरादून येथे प्रथम ओपन आंतरराष्ट्रीय योगा स्पेर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील स्पर्धक सहभाग घेण्याकरिता आले होते. या स्पर्धेत गोंदियातूनही अनेक मुले व मुली सहभागी झाले होते. या स्पर्धेत गुजराती शाळेत शिक्षण घेणारी जान्हवी दिनेश फुलबांधे हिने ११ ते १७ वयोगटात योगा स्पर्धेत सहभाग घेत सहावा स्थान प्राप्त करून आपला व जिल्ह्याचा मान वाढविला. बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने जान्हवीचा सत्कार करण्यात आला. जान्हवीने आपल्या यशाचा श्रेय आपल्या वडील व आई, शाळेतील शिक्षक दिपक सिक्का, आनंद गाडेकर, शिक्षीका सुषमा टेकाम शाळेतील सर्व शिक्षकांना दिले.
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक चन्ने, महेश उरकुडे, बबलू उरकुडे, अनुप फुलबांधे, अनुप चन्ने, दिनेश फुलबांधे, अंकित चन्ने, सुनिता फुलबांधे, उमेश फुलबांधे, भावना उरकुडे, आचल उरकुडे, आशिष कुंभलवार, सुधीर ढगे, बेलगे आदी उपस्थित होते.