न्यूझीलंड प्रथमच फायनलमध्ये, आफ्रिका चोकर्सच

0
9

ऑकलंड – अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 4 गडी राखून विजय मिळवला आहे. सुरुवातीला चार विकेट गमावल्याने आफ्रिकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण कोरी अँडरसन आणि एलियटने दक्षिण आफ्रिकेला चांगलेच झुंजवले. एलियटने एक चेंडू शिल्लक असताना स्टेनला एक षटकार खेचला आणि न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला. या पराभवामुळे आफ्रिकेला पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का पुसण्यात अपयश आले आहे.

पावसामुळे किवींना 298 धावांचे आव्हान मिळाले होते. त्यामुळे न्यूझीलंडला पावसाचा फटका बसणार अशी दाट शक्यता होती. ही चर्चा सुरू असतानाच मैदानात फलंदाजीला उतरलेल्या मॅक्कुलमने एकच फटकेबाजी सुरू केली. त्याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक केले त्या जोरावर न्यूझीलंडच्या पाच षटकांत 70 धावा झाल्या होत्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सहाव्या षटकातच फिरकिपटू इम्रान ताहीरला गोलंदाजीला बोलवावे लागले. दरम्यान ब्रँडन मॅक्कुलम फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पण 298 धावांमुळे फलंदाजांवर येणारा दबाव कमी करण्यात तो यशस्वी झाला होता. त्याने 26 चेंडूंमध्ये 59 धावा ठोकल्या. त्यानंतर किवींच्या चार विकेट लवकर गेल्या. त्यामुळे पुन्हा एकदा दबाव निर्माण झाला होता. पण कोरी अँडरसन आणि एलियटने शतकी भागीदारी करत या संकटातून संघाला बाहेर काढले. मोक्याच्या क्षणी अँडरसन बाद झाल्याने अखेरच्या षटकांत पु्न्हा दबाव वाढला होता. पण एलियटने अत्यंत थंड डोक्याने फलंदाजी करत, अगदी अखेरच्या षटकापर्यंत वाट पाहिली. अखेर एक चेंडू शिल्लक असताना एलियटने एक उत्तुंग षटकार खेचला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.
क्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. दक्षिण आफ्रिकेचे आमला आणि डी कॉक सलामीसाठी मैदानावर उतरले. पण दोघांनाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. चौथ्या षटकातच बोल्टने आमलाचा त्रिफळा उडवला. तर डी कॉकलाही त्याने आठव्या षटकात बाद केले. त्यानंतर ड्युप्लेसिस आणि रोसोऊ याने काहीशी संयमी फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदिरी केली. मात्र गपटीलने कोरी अँडरसनच्या गोलंदाजीवर रोसोउचा एक उत्कृष्ट झेल टिपला.
रोसोऊ बाद झाल्यानंतर ड्युप्लेसिस आणि डिव्हिलयर्स यांनी चौथ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पावसाने खेळात व्यत्यत आणला आहे. डिव्हिलियर्सने मैदानात आल्यापासूनच शक्य तेवढा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. 300 धावांच्या दिशेने त्यामुळे संघाने कूच केले होते. पण पावसाने संपूर्ण चित्र पाटलटले. पावसामुळे सामना 43 ओव्हर्सचा करण्यात आला. त्यात खेळ सुरू होताच सेट झालेला ड्युप्लेसिस 82 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या मिलरने मात्र जोरदार फटकेबाजी केली.

नाणेफेक जिंकली
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडच्या विरोधात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील विजेता प्रथमच फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. न्यूझीलंडने यापूर्वी सहावेळा तर दक्षिण आफ्रिकेने तीन वेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र कोणालाही फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही.