25.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home क्रीडा खेळाडूंनी जिल्हयाचे नावलौकीक करावे– अरविंद साळवे

खेळाडूंनी जिल्हयाचे नावलौकीक करावे– अरविंद साळवे

0
41

Ø  राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन

Ø  राज्यातील आठ विभागातील खेळाडूंचा सहभाग

 भंडारादि. 8 :- सर्व खेळाडूंनी जिद्दीने स्पर्धेमध्ये भाग घेवून आपल्या विभागाचे तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नावलौकीक करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले. महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे 7 ते 9 नोव्हेंबर 2019 या कालावधीत करण्यात आले आहे, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॉलबॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समिती सदस्य नंदीनी भोंगाडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून बॉलबॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे निवड समिती सदस्य  पी. हनुमंतराव, हरीश सतपती, जिल्हा ॲम्यच्युअर  बॉलबॅडमिंटन असोसिएशनचे सचिव राजेंद्र भांडारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, संदीप खोब्रागडे, महेश पडोळे उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये राज्यातील औरंगाबाद, लातूर, पूणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर व अमरावती या आठ विभागातील खेळाडू सहभागी झाले आहेत. यावेळी  बॉलबॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडू मेघा नरेश उईके यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडांगणाचे विधीवत पूजन करण्यात आले.तसेच मान्यवरांनी सर्व खेडाळूंना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचलन अर्चना बावणे यांनी तर प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी मानले.या स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता भोजराज चौधरी, मंगेश गुडधे, क्रीमा, त्रिवेणी बान्ते, रविंद्र वाळके, सुरज लेंडे, धनंजय बिरणवार, दिलीप पवार, मुटकुरे, राजेश मेश्राम, गोपाल घोती, प्रमोद बांते, सुशील वाघमारे, रामभाऊ धुडसे, बसंत पाल यांनी परिश्रम घेतले.