राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा संपन्न्
भंडारा, दि. 13:- राज्यस्तरीय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडाराच्या प्रांगणात उत्साही व क्रीडा वातावरणात संपन्न झाल्या. राष्ट्रीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा वेस्ट गोदावरी (आंध्रप्रदेश) या ठिकाणी आयोजित होत असलेल्या क्रीडा स्पर्धेकरीता क्रीडा संचालनालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या निवड समिती सदस्यांकडून महाराष्ट्र राज्याचा संघ निवड करुन अंतिम करण्यात आला.
राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट राज्याच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे या प्रमाणे आहेत. 14 वर्ष मुले- अरसलान शेख-हिंगोली, हर्षल ठाकरे वर्धा, अलतमेश खॉन फैय्याज खॉ- हिंगोली, सकेत तायडे- अमरावती, ओंकार कहार-पूणे, प्रथमेश सिंग –ठाणे, सय्यद राहिल-लातूर, ओम चव्हाण-अमरावती, सार्थक राठोड-वर्धा, अथर्व होले-पूणे. 17 वर्ष मुले- प्रज्वल बोरकर-पूणे, गौरव बागल-रायगड, अभिषेक खोत- कोल्हापूर, यश डिखोळकर-बुलढाणा, सुशांत खोमणे-पूणे, अनिकेत निम्बाळकर-नाशिक, पुरुषोत्तम सिंग-ठाणे, अभिषेक टिळेकर-पूणे, योगेश प्रजापती-वर्धा, चिराग वानखेडे-अमरावती. 19 वर्ष मुले- संकेत राखंडे- अमरावती, अभिषेक खैरनार-नाशिक, आयुष दळवी-पूणे, निखिल अंबागडे-वर्धा उज्वल खेकडे-अमरावती, रोहन सांगळे- बुलढाणा, अजय गिरी-भंडारा, शोएब शेख-ओरंगाबाद, सचिन भगत-लातूर, गौरव जगताप-पूणे.
14 वर्ष मुली- ज्योती दोरगे-पूणे, प्रतिक्षा गवळी-पूणे, अनुष्का सिंग-ठाणे, हर्षी शर्मा-ठाणे, भुमिका सुर्यवंशी-लातूर, लक्ष्मी तायडे-अमरावती, आर्या राऊत-वर्धा, देवयानी भरारे-यवतमाळ, आर्या वाईकर-पूणे, व्टिंकल लांबट-भंडारा. 17 वर्ष मुली- चेतना खंगरे-पूणे, सानवी पवार-ठाणे, मेघा उके-भंडारा, गुरुप्रीत धांदे-नागपूर, श्रावणी जाधव-रायगड, प्रिती कदम-पूणे, रोहीणी होटे-वर्धा, प्रणाली भोसले-सांगली, श्रध्दा गुरव- ठाणे, सई उपकारे- नाशिक. 19 वर्ष मुली- प्रियंका देवरे-नाशिक, शितल नखरिया-भंडारा, श्रध्दा मोरे-पूणे, गौरी तायडे-अमरावती, आफरीन शेख-औरंगाबाद, सारिका पाटील-कोल्हापूर, आचल धाडसे-वर्धा, ऋषिका श्योरान-मुंबई, वैष्णवी यादव-लातूर, आरती यादव-ठाणे यांचा समावेश आहे.राष्ट्रीय स्पधेकरीता निवड झालेल्या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेकरीता ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले.




