अंजनशिंगी,दि.17ः- येथील श्री.कान्होजीबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल येथे फिट इंडिया मुहमेन्टं व गो गर्ल गो उपक्रमाअंतर्गत दि.१२ ते १८ डिसेंबरपर्यंत दरवर्षीप्रमाणे या कालावधीत क्रिडा सप्ताहचे आयोजन करण्यात येते.प्राचार्य बी एम गाढवे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले.समाजातील प्रत्येक नागरिकामध्ये शारीरिक आरोग्यत चांगले राहण्याकरीता व्यायामसह इतर खेळामधे भाग घ्यावा व आरोग्य चांगले रहावे या करिता केंद्रशासन मार्फत फिट इंडिया मुहमेन्टं राबविण्यात येत आहे.या सात दिवसात योगासने , मनोरंजनात्मक कार्यक्रम,स्पर्धा, शारीरिक व्यायाम ,समतामुल्य चाचणी ,क्रीकेट,लगोरी,लंगडी, कबड्डी अश्या विविध खेळांचे आयोजन क्रीडा शिक्षक विनोद इंगोले यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या क्रीडासप्ताहाला विद्यार्थांकडून प्रतिसाद मिळाला असून सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते




