33.7 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home क्रीडा अखिल महाराष्ट्र पोलीस शुटिंग स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाने मिळविले दोन सुवर्णपदक

अखिल महाराष्ट्र पोलीस शुटिंग स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाने मिळविले दोन सुवर्णपदक

0
20

👉 बिहार येथे होणाऱ्या २० व्या ‘अखिल भारतीय पोलीस शुटिंग स्पर्धेकरिता गडचिरोली पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांची निवड

गडचिरोली,दि.17ः- राज्य राखीव पोलीस बल गट क्र.०१ पुणेच्या वतीने आयोजित २०वी अखिल महाराष्ट्र पोलास शुटिंग स्पर्धा गोळीबार मैदान वडाचीवाडी येथे पार पडली.या स्पर्धेत राज्यातील एकुण ५ पोलीस अधिकारी व २४५ पोलीस कर्मचारी यांनी भाग घेतला.या स्पर्धेकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोहवा/११६० संजय हजारे,नापोशि/३२२० अनिल कवडो पोशि/३८३३ किशोर माधमवार यांची निवड करण्यात आली होती. सदर खेळाडू पोलीस कर्मचाऱ्यांपैकी पोशि- अनिल कवडो यांनी ३०० मीटर लाईन पोझिशन या प्रकारात सुवर्ण पदक व पोशि- किशोर माधमवार यांनी २०० मीटर निलिंग पोझिशन या प्रकारात सुवर्ण पदक मिळवून यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे गडचिरोली पोलीस दलातील वरील तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची बिहार येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस शुटिंग स्पर्धकरिता निवड करण्यात आली आहे.गडचिरोली पोलीस दलातील या नेमबाज खेळाडु पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे (भा.पो.से.) यांनी कौतुक करून बिहार येथें होणाऱ्या स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.