सालेकसा,दि.17ः-युवा कुणबी समाज सेवा समिति महिला आघाडी साकरीटोला तालुका सालेकसाच्या वतीने 16 जानेवारी रोजी श्री विद्या गर्ल्स हायस्कूलच्या पटागणावर राजमाता जिजाऊंची प्रेरणा घेवून काम करणाऱ्या कुणबी समाजातील महिलांनी स्वतःच पुढाकार घेत महिला मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबाराय, क्रांतिज्योति सावित्रीबाई यांच्या चित्रासमोर दीपप्रज्वलित करुण करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन लताताई दोनोडे सभापती महिला व बालकल्याण यांचे हस्ते,उषाताई मेंढे माजी अध्यक्ष जि.प.गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.दिपप्रज्वलक म्हणून सभापती सुनंदाताई बहेकार, मंचपूजन वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ.सुषमाताई देशमुख,मुख्याध्यापिका अजयाताई चुटे,वंदनाताई काळे,मंजुषाताई दोनोडे,राधाताई बहेकार यांनी केले
यावेळी प्रमुख अतिथि म्हणून कल्पनाताई बहेकार,सिंधुताई भूते प.स.सदस्या,संगीताताई दोनोडे माजी जि.प.सभापती, ताताई शिवनकर, वनीताताई फुंडे,प्रमिलाताई दोनोडे,लीलाताई कठाने,चेतनताई कोरे, सोनाताई खोटेले उपस्थित होत्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी निर्भीडपणे महिलांसाठी शिक्षणाच्या मध्यमाने परिवर्तनाची सुरुवात केली असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी व्यक्त केले.राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्यiची स्थापना करणारा शिवबा घडविला यांचेसी प्रेरणा घेऊन आज महिला आणि तरुणांना स्वावलंबी होण्याची गरज आहे असे उदघाटक लताताई दोनोडे म्हणाल्या.सुनंदा बहेकार, डॉ. सुषमा देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात वस्ती व गांवपातळीवरील आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांनी आपल्या आरोग्याकड़े विशेष देऊन वेळोवेळी आरोग्य तपासणी करत राहावे असे विचार व्यक्त केले, नारीशक्तिनी आव्हान स्विकारुन भव्य महिला मेळाव्याच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडली. सौ.इंदुताई कोरे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीची स्थापना झाली. त्या माध्यमातून दर वर्षी महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम घेतले जात आहेत असे उदगार राधाताई बहेकार यांनी व्यक्त केले.प्रास्तविक समितिच्या अध्यक्ष इंदुताई कोरे यांनी केल.चालन सचिव किरणताई कोरे यांनी तर आभार उपाध्यक्ष स्वातिताई फुंडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी मिताली काले, दीपलता हत्तीमारे, प्रतिभा मेंढे, टीना चुटे, सविता येटरे, निखिता कावरे, प्रमिला दोनोडे, किरण कोरे, रेखा फुंडे, वैशाली मेंढे, अरुणा मेंढे, व महिला आघाडीच्या सर्व सदस्यानी सामूहिक परिश्रम घेतले.





