भंडारा,दि.21ः- महाराष्ट्र राज्याकडून खेळणाèया खेळाडूंंना १५ वर्ष महाराष्ट्र राज्याचा खेळाडू असावा, असा नियम असतांना सुद्धा स्वप्नील संजय पाटील कोल्हापूर याला प्राथमिक छाननी मध्ये हरीयाणा राज्याकडून खेळत असल्यामुळे अपात्र घोषीत केले होते. परंतू १८ फेब्रुवारी २०२० ला अंतिम निवड प्रक्रियेत त्याच खेळाडूला जलतरणचेच प्रतिनिधी असल्यामुळे वरील नियम डावलून थेट पुरस्कार देण्यात आला. अशा चुकीच्या व गैरप्रकारामुळे व हेतू पुरस्सर मैदानी खेळाला व खेळाडूंना डावलल्यामुळे महाराष्ट्रातील मैदानी खेळाडूमध्ये निराशा वाढेल. त्यामुळे आपण प्रत्यक्ष जातीने लक्ष घालून झालेली राज्य क्रिडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू जलतरण निवड रद्द करून qकवा त्यावर फेरविचार करून २०१८-१९ या शिवछत्रपती राज्य दिव्यांग क्रिडा पुरस्कार मैदानी खेळाला व खेळाडूला मिळवून दयावा, अशी मागणी पत्रकार परिषदेतूून दिव्यांग खेळाडू योगेश्वर रqवद्र घाटबांधे किटाळी यांनी केली आहे.
शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार व अन्य क्रिडा पुरस्कार सुधारीत नियमावली महाराष्ट्र शासन निर्णय दि. २४ जानेवारी २०२० च्या परिपत्रकानुसार शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) नियम क्रमांक ३ मध्ये दरवर्षी दोन पुरूष व दोन महिला खेळाडूंना पुरस्कार देण्यात यावा. यामध्ये जलतरण व मैदानी अॅथलेट्निस) असे स्वतंत्र पुरस्कार चक्राकार पद्धतीने देण्यात यावे. इतर खेळ प्रकारासाठी एक पुरूष व एक महिला पुरस्कार देण्यात यावा, असा महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता. मागच्या वर्षी २०१७-१८ ला जलतरण या स्पर्धेतील खेळाडूंना पुरूष व महिला दोन्ही पुरस्कार मिळाले होते. मग या वर्षी चक्राकार पद्धती सुरू करतांना पत्रपरिषदेत प्रहार जिल्हाध्यक्ष रवी मने, सुनील काहकर, घाटबांधे मैदानी खेळांना प्राधान्य दयायला पाहिजे होते. परंतू निवड समितीमध्ये जलतरण विभागाचे दोन पदाधिकारी सदस्य असल्यामुळे त्यांनी हा कायदा या वर्षीचा आहे.
अगोदर जलतरणाला ५ पैकी ३ पुरस्कार मिळवून दिले. पुढच्या वर्षी मैदानी खेळाला पुरस्कार मिळेल qकवा देण्यात येईल, असा सर्व मैदानी खेळाला व खेळाडूंना अन्याय व भेदभाव, हेतुपरस्सर करून महाराष्ट्रातील मैदानी दिव्यांग खेळाडूंवर निराश व हताश होण्याची आणि राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके मिळवून त्यांचा फायदा होत नसेत तर खेळणे सोडण्याची वेळ आली आहे. यावर्षी हा राज्य क्रिडा दिव्यांग पुरस्कार मैदानीच खेळाडूंना मिळणार हे माहित असल्यामुळे महाराष्ट्रातील आलेल्या ३७ क्रिडा पुरस्कार प्रस्तावापैकी एकटया मैदानी खेळाचे ८ ते १० अर्ज होते. मग जर यावर्षी मैदानी खेळाला पुरस्कार दयावयाचेच नव्हते तर तसेच सूचना नोटीफीकेशन मध्ये दयायला पाहीजे होते. दिव्यांग मैदानी खेळाडू आपला वेळ व पैसा खर्च करून अर्ज केले नसते. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास कशाला केला असता. तसेच आर्थिक नुकसानही झाले नसते.
मैदानी खेळात जास्त क्रिडा प्रकार आहेत. त्यामुळे जास्त खेळाडू सहभागी होतात. परंतू पुरस्कार देतांना विशेष प्राधान्य हे जलतरण खेळाला दिले जाते. त्यामुळेच मागच्या वर्षी दोन आणि यावर्षी तीन, असे पाच पुरस्कार जलतरण खेळाला मिळणार आहेत. मैदानी खेळाडूंना राज्य स्पर्धेत फ्नत ३ व राष्ट्रीय स्पर्धेत ३ असे ६ खेळात जास्तीत जास्त फ्नत सहाच खेळ खेळता येतात. तर जलतरण या खेळात राज्य स्पर्धेत ७ ते ८ व राष्ट्रीय स्पर्धेत ७ ते ८ असे एकूण १४ ते १६ मेडल एका वर्षात प्राप्त होतात. त्यामुळेच जलतरण व मैदानी स्पर्धांना वेगवेगळे स्वतंत्र राज्य राज्य क्रिडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) देण्यात यावे. नाहीतर जलतरण सोडून बाकी खेळाडूां राज्य क्रिडा पुरस्कार मिळणारच नाही.





