आपत्तीशी लढा चॅटबोटव्दारे भंडारा प्रशासनाचा डिजीटल उपक्रम

0
7

भंडारा,दि: 20 जिल्हयात 2020 साली मोठया प्रमाणावर आलेल्या महापूराच्या अनुभवाने भंडारा जिल्हा प्रशासनाने अधिक गतीने काम करत यावर्षीचे आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले आहे.जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांच्या सलग चार बैठका घेतल्या तसेच जिल्हयातील राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाला भेट देवून पावसाळयातील विसर्गाबाबत समन्वय संपर्क व संवादाने पावसाळयातील पूरपरिस्थीतीबाबत आढावा घेतला. यंत्रणांना दिलेले काम व त्यांचा पाठपूरावा करण्यात आल्याने मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाची  पूर्वतयारी  पूर्ण झाली.

धोकादायक पूल, कठडे तसेच रस्ते इथे दिशादर्शक फलक लावण्यात आले.जिल्हयातील 300 युवक युवतींना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर आपत्ती निवारणासाठी आवश्यक असणा-या साधनसामुग्रीत वाढ करण्यात आली.2020 या वर्षी जिल्हयात 2 बोटीऐवजी आता 25 बोटी तयार आहेत. जिल्हयातील तंत्रज्ञान स्नेही आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी अभिषेक नामदास यांनी माध्यमांसाठी व्हॉटसअपचा वापर केला.

तसेच या क्रमांकावर चॅटबोट ॲक्टीव्ह केले.गेल्यावर्षी 22 हजारावरूनही अधिक नागरिकांनी या चॅटबोटव्दारे माहिती घेतली आहे.जिल्हा प्रशासनातील आपत्ती नियंत्रण कक्षाला पूरपरिस्थीती कींवा अन्य कोणत्याही आपत्तीत माहिती घेण्या व देण्यासाठी दक्ष राहावे लागते.नियंत्रण कक्षाच्या नियमीत संपर्क 07184-2511222 क्रमांकाव्यतीरीक्त या डिजीटल कार्यप्रणालीने योग्य माहितीची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

9767968166 या क्रमांकावर चॅटबोट  असून तो सेव्ह केल्यावर त्या नंबरवर hi मेसेज करावा. त्यानंतर पर्जन्यमान, नदी, धरण पातळी अहवाल, विशेष सूचना, बंद रस्ते, संपर्क तुटलेली गावे, वीज बचावाच्या सूचना आदी माहिती  त्या माहितीचे अनुक्रमांक टाकत गेल्यास मिळते.

वापरास अत्यंत सोपी व सुलभ व अचूक माहितीने ही चॅटबोट प्रणाली लोकप्रिय ठरली आहे. प्रभावी आपत्ती नियंत्रणाच्या दृष्ट्रीने अचुक माहिती नागरिकांना या चॅटबोटव्दारे जात आहे.

तसेच आपत्ती व्हॉटस अप ग्रुपवर हवामानखात्याकडून आलेल्या अलर्ट वेळोवेळी देण्यात आले.विज  नुकतेच 11 जुलै रोजी  मोहाडी तालुक्यातील नृसिंह मंदिर (वैनगंगा नदीच्या मधोमध) येथे 5 भाविक मनोहर नींबार्ते,  मनोहर खुरगेकर,कल्पना खुरगेकर, गिरीधर वाघाडे वैशाली चौधरी अडकले होते.त्यांची ही सुखरूप सुटका प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाने शक्य झाली.

शैलजा वाघ दांदळे, जि.मा.अ,भंडारा