अर्जुनी-मोर.- तालुक्यातील आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग असलेल्या झाशिनगर येथील चाकाटे कुटुंबातील दोन सख्या भावांनी एकाचवेळी महसूल सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण करुन आईवडीलांचे नावलौकीक केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
११ फेब्रुवारी २०२५ ला जाहिर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल चाकाटे कुटुबिंयाकरीता एक आनंदाचा क्षण ठरला.अल्पभूधारक असलेल्या गोपाल धनीराम चाकाटे यांच्या दोन्ही मुकेश आणि संदीप यांनी एकाच वेळी महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुकेश आणि संदीप दोघांनीही झाशिनगर येथेच पहिले ते दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेयआई दहावी तर वडील धनीराम ७ वा वर्ग शिकलेले दोन्हीही दांपत्य मिळेल ते रोजगार मजुरी करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या मुलांना शिक्षण दिले. संदीपने बीएसडब्ल्यू तर मोठा मुलगा मुकेशने बीएससी पूर्ण करून अभ्यासिका केंद्र गाठले. कोरोना पासून जिद्द चिकाटी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे कुठलेही खाजगी वर्ग शिकवणी न लावता स्वयंअध्यनातून अर्जुनी मोरगाव येथे अभ्यास केंद्रात जाऊन अभ्यास करणे असा त्यांचा दिनक्रम ठरला. ३० एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा दिली, त्यानंतर १७ डिसेंबर रोजी मुख्य परीक्षा ही सर केली. एप्रिल २०२४ मध्ये कौशल्य चाचणी पास करत अखेर प्रलंबित असलेला निकाल ता.११ फेब्रुवारी २०२५ जाहीर झाला.जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर महसूल सहाय्यक पद मिळवले आणि अनेक वर्षाचं आई-वडिलांसह आपले स्वतःचेही स्वप्न पूर्ण केले.