= संजयनगर येथे महाउत्सव थाटात साजरा
अर्जुनी-मोर. -तत्कालीन परिस्थितीत बंगाली समाज बांधवांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत निवडुन पाठवुन फार मोठे उपकार केले.त्यामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार ठरले.बंगाली बांधवांचे अनंत उपकार देशावर असल्याने त्या उपकाराची परतफेड करण्याची आता ख-या अर्थाने वेळ आली आहे. अर्जुनी-मोर. तालुक्यातील जेवढे काही बंगाली कॅम्प आहेत.ते आपल्या कुटुंबासारखे आहेत.मलाही विधानसभा निवडणुकीत भरघोष मतांनी निवडुन आणतात.त्यामुळे बंगाली बांधव विश्वासास पात्र आहेत. संपुर्ण बंगाली वसाहतीचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याकडे आपले लक्ष असणार आहे.सोबतच त्यांचा सामाजीक स्तर उंचावण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत.बंगाली बांधव अत्यंत साधे,कष्टाळू,व धार्मीक सुध्दा आहेत.त्यामुळे बंगाली समाज बांधवाचे सर्वांगीण विकासासाठी आपन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार ईंजी.राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी-मोर. तालुक्यातील बंगाली वसाहत संजयनगर येथे तालुक्यातील.20 आयोजित श्री शांती हरिचाॅदाय ठाकुर वार्षीक महाउत्सव कार्यक्रमात विषेश अतिथी म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाला जि.प.माजी उपाध्यक्ष यशवंत गणवीर, माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे,योगेश नाकाडे,व्यंकट खोब्रागडे,राजहंस ढोक,राकेश जायसवाल,उत्सव समितीचे शंकार ढाली,मनोज सरकार,दिपक राॅय,निताई सरकार,व अन्य मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम आमदार बडोले यांचे हस्ते देवी पुजन करण्यात आले.यावेळी बंगाली बांधवांचे वतीने आमदार राजकुमार बडोले यांचा जंगी सत्कार करण्यात आला.19 आणी 20 फेब्रुवारीपर्यंत हा वार्षीक महाउत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हारान ढाली, जयदेव सरकार, सुनील सरकार, तारक राय ,प्रवीण मिस्त्री नेपाल सरकार ,विष्णू मृधा ,ठाकूर तरफदार ,सुनील काबिराज ,विश्वनाथ राय ,दिनेश राय ,हरेण मंडल ,अंमल घरामी तर पुजारी म्हणून मलीन मंडल, सौ सावित्री राय यांनी काम पाहिले