अर्जुनी मोरगाव,दि.24ः गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोर तालुक्यातील शिरेगावबांध ग्रामपंचायतीला केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाचा चाईल्ड फ्रेंडली पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत एकमेव ठरली आहे.
केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाचे संयुक्त सचिवांच्या स्वाक्षरीचे मंगळवारी निघालेल्या पत्रात महाराष्ट्रातून गोंदिया जिल्ह्यातील शिरेगावबांध या एकमेव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यापूर्वी या गावाला केंद्र शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार,पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुका जिल्हा नागपूर विभागातून पुरस्कार आणि केंद्र शासनाचा दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे, विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीचे सरपंच हेमकृष्ण उर्फ दादा संग्रामे यांच्या नेतृत्वात उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच संपूर्ण शिरेगावबांधवासी जनता एकजुटीने गावाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असतात.
त्यांच्या या यशात सेवानिवृत्त गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, विद्यमान गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड,विस्तार अधिकारी राजेंद्र वलथरे, अनुप भावे व इतर पंचायत समिती कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वपूर्ण राहिले आहे.
सदर पुरस्कार हा गावातील लहान बालके त्यांचा विकास त्यांच्या शाळेत सर्व सोयीसुविधा पुरविणे बालक कुपोषित होणार नाही. यासाठी ग्रामपंचायत विविध उपक्रम विविध उपक्रम राबविते बालक जन्माला ही पासून त्याला मूलभूत सुविधा पुरविणे त्याचे आरोग्याची काळजी घेणे त्याला पोसणार देण्यात येईल, याची व्यवस्था सुद्धा करण्यात येते. तसेच कोणीही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतल्या जाते. बालकांचा शैक्षणिक शारीरिक बौद्धिक विकास होण्यासाठी ग्रामपंचायत सदैव कार्यरत असते गेल्या वर्षीपासून केंद्र शासनाने हा पुरस्कार जाहीर केला. मात्र गेल्यावर्षी महाराष्ट्रातून एकही ग्रामपंचायत पात्र नव्हती या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे आम्ही यानंतर सुद्धा बालकांच्या सर्वांनी विकासासाठी झटत राहू असे सरपंच हेमकृष्ण संग्राम यांनी म्हटले आहे.





