गोंदिया,दि.१५ः केंद्र शासनाकडून नक्षलग्रस्त भागांत उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानित करण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील ४0२ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट रोजी होणार्या शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान पुरस्कार वितरण केले जाणार आहे.यात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, राजीव नवले, दिपाली खन्ना,मंदार जावळे तसेच १५ पोलिस निरीक्षक, १२ सहाय्य पोलिस निरीक्षक, ४५ पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदार, पोलिस नायक, कॉंस्टेबल यांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. जिल्ह्याच्या पूर्वेला छत्तीसगड, उत्तरेकडे मध्यप्रदेश तर दक्षिणेकडे गडचिरोली आहे. या तीनही क्षेत्रातील नक्षल कारवायांचे पडसाड जिल्ह्यात नेहमीच पहावयास मिळतात. जिल्ह्यातही नक्षलांचे दलम अधूनमधून सक्रीय झाल्याचे पहायला मिळते. मात्र जिल्हा पोलिस प्रशासन आपले कर्तव्य चोखपणे बजावत असल्यानेच आजघडीला नक्षल कारवायांचा प्रभाव कमी होत चालला असून नक्षलग्रस्त भागातील नागरिकही जागृती झाले आहे. या कर्तव्यात विशेष कामगिरी करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचा दर दोन वर्षाने आंतरिक सुरक्षा सेवा पदक देऊन सन्मान करण्यात येतो. यंदा जिल्ह्यातील ४0२ पोलिस अधिकारी व कर्मचार्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या सर्वांचा प्रस्ताव केद्रीय गृहमंत्रालयाकडे तत्कालीन पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी सादर केलेला होता.





