गडचिरोली,दि.21:- सोमनपल्ली येथील पंधरा नागरिक तेरवीच्या कार्यक्रमासाठी छत्तीसगड राज्यात तेरवीच्या कार्यक्रमासाठी गेलेले जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली येथील 15 नागरीक हे परत आपल्या गावाला लाकडी डोग्यांने इंद्रावती नदीतून येत असताना बोट (नाव ) पलटल्याची घटना घडली.यामध्ये 10 महिला व 5 पुरुषांचा समावेश होता.त्यापैकी पोलिस व स्थानिकांच्या मदतीने 13 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.तर दोन जणांचा शोध सुरु आहे.पोलिस विभाग व वनविभागाचे अधिकारी इंद्रायणी नदीपात्रात शोध मोहिम सुरु केली आहे.बेपत्ता असलेल्या मध्ये कांता सत्यम येलम व शांता शिवय्या गावडे नामक 2 महिलांचा समावेश आहे.