3 दहशतवादी ठार, एक जवान जखमी; सर्च ऑपरेशन सुरु

0
7

वृत्तसंस्था

श्रीनगर दि.२३:- जम्मू-काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या एन्काउंटरमध्ये भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. उत्तर काश्मीरच्या हंदवाडाच्या जंगलामध्ये भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी उशिरा रात्रीपासून चकमक सुरु होती. गोळीबारात एक जवान जखमी झाला. रविवारी सकाळी लष्कराने या भागात सर्च ऑपरेशन सुरु केले, ते अजूनही सुरु आहे. एक दहशतवादी लपून बसला असण्याची शक्यता लष्कराला आहे. त्याला शोधण्यासाठी लष्कर स्थानिक पोलिसांचीही मदत घेत आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान जंगलातून फायरिंग होत असल्यामुळे एक दहशतवादी होत असल्याचा शक्यतेला बळकटी मिळाली आहे.लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडामधील एका घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. शनिवारी मध्यरात्री शोधमोहिम राबविण्यात आली. या दरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. तर, एक जवान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षकांकडून परिसरात शोधमोहिम सुरू आहे.