23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ तीन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

तीन शेतकऱ्यांनी संपविले जीवन

0
27

नागपूर दि.२३- कर्ज आणि नापिकीच्या चटक्‍यांनी त्रस्त झालेल्या विदर्भातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन; तर अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश आहे.
मलकापूर तालुक्‍यातील धरणगाव येथील विजय पाटील (वय 35) ,चिखली तालुक्‍यातील लिंगा येथील नरहरी नामदेव गाढवे ,वरुड तालुक्‍यातील पवनी सक्राजी येथील शेतकरी गुलाबराव गोविंदराव ठाकरे (वय 80) यांनी शुक्रवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली.

blank