ज्योत आणण्यासाठी निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला ४ ठार, २१ जखमी

0
33

नगर दि. १३:– नगर-दौंड रस्त्यावर चिखली येथे मंगळवारी सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत.
नवरात्रोसत्व सुरु झाल्याने पिकअप व्हॅनमधून भाविक देवीची ज्योत आणण्यासाठी चिखली येथे चालले असताना हा भीषण अपघात झाला. कंटेनरच्या धडकेने पिकअप व्हॅनमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त पिकअप व्हॅनमध्ये बहुतांश तरुण होते. नवरात्रीच्या उत्साहात हे सर्व जण चालले असताना हा दुर्देवी अपघात झाला. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.