NS विक्रांत प्रकरण:किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

0
24

मुंबई-INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे त्यांना या प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वाढली आहे. कोर्ट या प्रकरणी सोमय्यांचे पुत्र निल यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी करणार आहे.

INSविक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्राम्बे पोलिसांनी त्यांना समन्स बजावला होता. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली, पण त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. तर निल सोमय्यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार आहे.

याबाबत सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, आज सकाळी युक्तिवाद झाला. आता जामीन फेटाळल्याचे मला समजले आहे. युक्तिवादादरम्यान सोमय्यांमार्फत कागदपत्रे दाखविण्यात आली. पण या कागदपत्रानुसार, सोमय्यांनी जवळ-जवळ गुन्हाच कबूल केला हे स्पष्ट झाले आहे.

मी गुन्हा केलेला नाही, मी या प्रकरणात विक्रांत वाचविण्यासाठी राज्यपालाकडे पैसे जमा करणार असे कागदपत्रांत नमुद आहे पण या प्रकरणातील तपासात त्यांची कोठडी महत्वाची आहे असे न्यायालयाने सांगितल्याचेही वकील प्रदीप घरत म्हणाले.

किरीट सोमय्यांवर गुन्हा

INS विक्रांत या युद्धनौकेच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी जनतेकडून 56 कोटी गोळा केले. मात्र नंतर त्या पैशांचा स्वत:च्या निवडणुकीसाठी वापर केला आणि बरीच मोठी रक्कम मुलगा नील सोमय्या यांच्या कंपनीत टाकली, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी गुृरूवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांविरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ट्राम्बे पोलिसांनी समन्स बजावण्यात आले आहे. उद्या सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण

INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर ठेवण्यात आला आहे. निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी सोमय्या पित्रा-पुत्रांना अटक होणारच असा इशारा दिला होता त्यानंतर आता सोमय्या पिता-पुत्रांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेतही सोमय्याविरुद्ध तक्रार

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांनी आयएनएस विराट जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेल्या 58 कोटींचा निधी हडप केला, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील शिवसेना सोमय्यांविरूद्ध आक्रमक झाली. औरंगाबादेतील शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत यांच्या नैतृत्वात शिवसेनेचे शिष्टमंडळाने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली आहे.

रक्कम गेली कुठे? खैरेंचा सवाल

किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्था आणि देशभावनेची शुद्ध फसवणूक केली आहे. भाजपचा झेंडा घेऊन किरीट सोमय्यांनी 58 कोटी रूपये गोळा केले आहेत. हा आकडा 100 कोटींचा असेल ही रक्कम राजभवनात जमा झाली नसेल तर गेली कुठे, भाजपने ही रक्कम निवडणूकीत वापरली की, सोमय्यांच्या इन्फ्रामध्ये वळविली असा प्रश्नचिन्ह शिवसेनेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

म्हणाले -सोमय्या पिता-पुत्र भाजपशासित राज्यांत लपले की देशाबाहेर पळाले? त्यांच्या विरोधात लवकरात लवकर लुक आऊट नोटीस जारी करा

न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या आपल्या मुलासह परदेशात पळून गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. ‘किरीट व निल सोमय्या हे दोन लफंगे कुठे लपलेत? मेहूल चोक्सी व सोमय्या यांची मैत्री आहे. त्यामुळे ते देशातून पसार झालेत काय? त्यांच्या विरोधात तत्काळ लुक आऊट नोटीस जारी केली पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘सोमय्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेला पैसा भाजपला दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे की नाही याचा निर्णय सरकारने घ्यावा,’ असेही राऊत यावेळी म्हणालेत.

किरीट ​​​​​ ​​​​​​सोमय्यांनी राजभवनाच्या नावावर पैसा गोळा केला; पण हे पैसे त्यांनी केंद्रात द्यायला हवे होते. चोर लफंगे कुणाचेही नसतात. सोमय्यावर संकट आले आता ते भाजपला घेऊन बुडतील. सोमय्यांनी गोळा केलेले पैसे भाजपकडे दिले असे सांगितले. मग या पैशांचे भाजपने काय केले.​ तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे खजिनदार कोण होते हे तपासावे लागेल या प्रकरणी भाजपला गुन्हेगार करायचे आहे का? हे सरकारला ठरवावे लागेल असे वक्तव्य करीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.

आयएनएस विक्रांत प्रकरणी संजय राऊत यांनी माध्यमांना सविस्तर मुलाखत दिली. ते म्हणाले, किरीट सोमय्या आणि निल सोमय्या हे दोन लफंगे कुठे पळुन गेले? ते देशाबाहेर पळून जाण्याची भिती वाटते. मेहुल चौक्शी आणि किरीट सोमय्या यांच्यात मैत्री आहे. चौक्शी सारखे सोमय्याही पळुन जाणार नाहीत ना, त्यांना लुक आऊट नोटीस द्यायला हवी असेही राऊत म्हणाले.

जर सोमय्यांनी चुकीचे काम केले तर राजभवनाची इभ्रत जाईल. मुंबई पोलिस लवकरच त्यांना पकडतील आणि त्यांना या सर्व आरोपांचा हिशोब द्यावा लागेल असेही संजय राऊत म्हणाले.

आता भाग सोमय्या भाग सिनेमा काढावा लागेल

सोमय्या या महाशयाने पैसे गोळा केले पण ते नॉट रिचेबल आहेत आता भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा काढायला हवा. 711 डबे फिरवून त्यांनी 140 कोटी रुपये गोळा केले. राजभवनात पैसे गोळा करण्याच्या नावाने पैसे दिले, पण त्यांनी ते पैसे भाजपला दिले. हे पैसे निवडणुकीत वापरल्याची त्यांनी कबुली दिली. उरलेले पैसे मुलाच्या कंपनीत पांढरे करून वळविले. सोमय्यांना ताब्यात घेतल्यानंतरच अजून तपशील पुढे येईल. यात भाजपने खुलासा करायला हवा. आम्ही हे प्रकरण काढल्यानंतर ”मी पक्षाकडे पैसे जमा केले” सोमय्यांचे हे विधान आहे हेही लक्षात ठेवायला हवे.

भाजपला गुन्हेगार करायचे का हे आता ठरवू

राजभवनाच्या नावावर त्यांनी चेक दिले. पण त्यांनी हे पैसे केंद्रात द्यायला हवे होते. भाजपला गुन्हेगार करायचे आहे का हे सरकारला ठरवावे लागेल. तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे खजिनदार कोण होते हे तपासावे लागेल. जर भाजपकडे किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केले असतील तर या पैशांचे भाजपने काय केले. चोर लफंगे कुणाचेही नसतात. सोमय्यावर संकट आले ते भाजपला घेऊन बुडवणार आहेत.

किरीट सोमय्या ब्लॅकमेलर

किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलर आहेत. अख्ख्या जगाला हे माहित आहे. लोकांकडून पैसे वसूली ते करतात. ईडीच्या कार्यालयात जाऊन ते करतात? मी हेही लवकरच बाहेर काढणार आहे. आज त्यांचे एक प्रकरण मार्गी लावत आहे असे असंख्य प्रकरण रांगेत उभे आहेत, अशा सर्व प्रकरणांत भाजपचा सहभाग आहे. 13 वर्षे पैसे वापरले याचा हिशोब भाजपला द्यावा लागेल. बाप – बेटे बुडतीलच पण जाता -जाता ते भाजपलाही बुडवणार आहे.

INS विक्रांत प्रकरणाची व्याप्ती मोठी, घोटाळा झाला हे स्पष्ट यात राजकारण नाही. व्याप्ती मोठी आहे हे दोन ठग कोठे आहे.

केंद्रसरकारच्या तपास यंत्रणांनीही लवकर तपास करून किरीट सोमय्याना मुंबई पोलिसांच्या ताब्यात द्यावे. ते नक्कीच भाजपशासित राज्य गोवा अथवा गुजरातमध्ये आहेत. खोटे कागद तयार करण्याचा प्रयत्न सोमय्या करीत आहेत. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. या राज्यातील न्यायालय आणि त्यातील लोक सत्यवादी आहेत असेही राऊत म्हणाले.

आमच्यावर पाळत ठेवली जात होती. आमचे फोन टॅप केले जात होते हे मला माहिती नाही उलट ही माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाले. हे काम तेव्हाच्या सरकारातील बॉसने केले अर्थात त्यांचा फडणवीस यांच्याकडे रोख होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ नये यासाठी हालचाली सुरू होत्या आमच्या राईट ऑफ प्रायव्हसीवर हल्ला आहे असेही राऊत म्हणाले. माझ्यावर पाळत ठेवा, फोन टॅप करा आम्ही डरपोक आणि पळकुटे नाही हे त्यांनाही माहित आहे हेच भाजपचे दुखः आहे. आम्ही कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास तयार पण देशात मनमानी, हुकुमशाही सुरू आहे त्यासाठी कुणाला तरी संकटाला सामोरे जावे लागेल.