राखीव श्रेणीच्या उमेदवारास आता खुल्या जागेचा हक्क, खुल्या श्रेणीतील उमेदवारांच्या तुलनेत हवेत जास्त गुण

0
27

नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयाने खुल्या श्रेणीतील अंतिम उमेदवारांच्या तुलनेत जास्त गुण मिळवणाऱ्या राखीव श्रेणीच्या उमेदवारांच्या बाजूने महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्यांना खुल्या श्रेणीत जागा/पद मिळण्याचा हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठाने म्हटले की, राखीव श्रेणीशी संबंधित उमेदवार खुल्या श्रेणीत जागांसाठी दावा करू शकतात. मात्र मेरिटमध्ये त्यांची योग्यता आणि स्थिती पाहून त्यांना असे करण्याची पात्रता देत असणे आवश्यक आहे. या प्रकरणात जोधपूरच्या केंद्रीय प्रशासकीय लवादाने एका उमेदवाराने दाखल केलेला अर्ज मान्य करत ओबीसी प्रवर्गाशी संबंधित ज्या उमेदवारांकडे जास्त पात्रता आहे त्यांना खुल्या श्रेणीच्या जागांत समायोजित करण्याची अनुमती दिली होती. हायकोर्टाने लवादाच्या या आदेशाला आव्हान देणारी बीएसएनएलची रिट याचिका फेटाळून लावली होती.