40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home Top News ताडोबातील सर्वात वयोवृद्ध वाघडोह वाघाचा मृत्यू

ताडोबातील सर्वात वयोवृद्ध वाघडोह वाघाचा मृत्यू

0
49

blank

चंद्रपुर,दि.23 :-चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा आज सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाळा येथे एका गुराख्याचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून वाघाडोह वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. १७ वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.The death of the oldest tiger in Tadoba दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड झाले होते.
हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता.तसेच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसे आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होता.