37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News Breking-देवरी तहिसलदाराच्या कक्षात रेतीमाफियाचा हुडदंग,घटनेनंतर फरार

Breking-देवरी तहिसलदाराच्या कक्षात रेतीमाफियाचा हुडदंग,घटनेनंतर फरार

0
164

blank

गोंदिया,दि.19ः- जिल्ह्यातील देवरी तहसिल कार्यालयाचे तहसिलदार श्री इंगाेले यांचे कक्षात 18 जानेवारीला सायकांळी साडेसात आठ वाजेच्या सुमारास एका रेतीमाफियाने तहसिलदाराच्या कक्षात शिरुन जप्त केलेल्या वाहनावरुन वाद घालण्यास सुरवात केली.तसेच या वादादरम्यान हुडदंग घालून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.या दरम्यान त्या कक्षात तहसिलदार इंगोले यांना भेटण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.महेंद्र गजभिये हे सुध्दा तिथे हजर होते.दरम्यान रेतीमाफियाच्या हुडदंगाचे चित्रीकरण ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत असतानाच त्या रेतीमाफीयाने शिक्षणाधिकारी गजभिये यांचा मोबाईल हातातून हिसकावून फोडले आणि तो फोडलेला माेबाईल घेऊन तहसिलदार कक्षातून फरार झाला.या सर्व घटनेनंतर वरिष्ठांना माहिती देण्यात आली.कार्यालयात असलेले अनेक अधिकारी कर्मचारी सुध्दा यावेळी बाहेर गप्प राहिले मात्र तहसिलदारांच्या मदतीला गेले नसल्याचेही वृत्त हाती आले आहे.दरम्यान रात्रीला दोन वाजता या सर्वप्रकरणाची तक्रार देवरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.तक्रार दाखल झाल्यानंतर शिक्षणाधिकारी गजभिये हे आपल्या सहकारीसोबत परत गोंदियाला निघाले.वृत्तलिहिपर्यंत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नव्हते.

blank