लोकशाहीवर बिनधास्त भाषण देऊन सगळ्यांना हसवणाऱ्या कार्तिकच्या भेटीला पोचले मुख्यमंत्री

0
17

प्रजासत्ताकदिनी ‘लोकशाही’ विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीर या विद्यार्थ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी वाटूर येथे भेट घेऊन त्याचे कौतुक केले. रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक शिक्षण घेत आहे.

जालना : देशभरात गुरुवारी 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेच्या कार्यक्रमात ‘लोकशाही’ (Lokshahi Speech by School Boy ) या विषयावर भाषण देणारा कार्तीक हा लहान मुलगा हिरो बनला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं चिमुकल्याचे भाषण ऐकून सगळेच जण त्याचे फॅन बनले आहे. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर हा मुलगा नेमका आहे तरी कोण, तो राहतो कुठे असे प्रश्न सगळ्यांनाचा पडले आहे. मात्र, लोकशाहीवर बिधास्त भाषण देऊन सगळ्यांना हसवणाऱ्या लहान मुलाची खरी कहाणी डोळ्यात पाणी आणणारी अशी आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ”लोकशाही” विषयावर भाषण ठोकणारा त्या लहान मुलाचा अखेर शोध लागला आहे. कार्तिक जालिंदर वजीर असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात कार्तिक शिकत आहे. कार्तिक खूपच गोरा असल्यानं त्याला त्याचे मित्र आणि सगळी मुलं भूऱ्या म्हणून चिडवतात.
कार्तिकचे वडील शेतकरी असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. केवळ भाषणात त्याने सांगितल्याप्रमाणेच नाही तर मुळातच कार्तिक खूपच खोडकर आहे. व्हायरल झालेल्या भाषणाच्या व्हिडीओतून कार्तिकने सर्वांना आपलंसं केले आहे. मात्र, त्याच्या या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप मोठा संघर्ष दडलेला आहे. त्या कार्तिकचे आज मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले तर माजी मंत्री राजेश टोपेंनीही त्याला आपल्या निवासस्थानी बोलावून त्याचे कौतुक केले आहे.

कार्तिकचा शाळेतील ओरीजल व्हीडीओ